Subscribe Us

header ads

अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीतून सावरण्यासाठी आ.संदीप क्षीरसागरांचा शेतकर्‍यांना धीर

बीड स्पीड न्यूज 


अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीतून सावरण्यासाठी आ.संदीप क्षीरसागरांचा शेतकर्‍यांना धीर

महसूल, कृषी विभागाची संयुक्त बैठक; वीज कोसळून मृत्यू झालेल्या महिलेच्या कुटूंबाला आर्थिक मदत

बीड (प्रतिनिधी):- जिल्हाभरात अतिवृष्टीने हाहाकार माजवला आहे. शेतीपिकांच्या नुकसानीसह जिवीत हानीचेही प्रकार घडत आहेत. अशात हैराण झालेल्या शेतकऱ्यांसह जनतेला धीर देण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून आ.संदीप क्षीरसागर सध्या शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन त्यांना आधार देताना तसेच शासन दरबारी पाठपुओरावा करताना दिसून येत आहेत. यातूनच सोमवार (दि.१७) रोजी तहसील कार्यालय येथे आ.संदीप क्षीरसागर यांनी महसूल व कृषीसह विविध विभागांची बैठक घेऊन, बांधावर जाऊन नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश दिले‌. तसेच दि.११ ऑक्टोबर रोजी मोहनगिरवाडी येथील वीज कोसळून मृत्यू झालेल्या महिलेच्या कुटूंबाला नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनांतर्गत आर्थिक मदत व कुटूंबीयांचे सांत्वन केले. जिल्हाभरात सातत्याने अतिवृष्टी सुरूच असून यामुळे शेती व शेतीपिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. त्यामुळे आ.संदीप क्षीरसागर यांनी सोमवार (दि.१७) रोजी तहसील कार्यालय येथे महसूल, कृषी, पंचायत समिती, विमा कंपनी अधिकारी यांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत, तालुक्यातील सर्वच मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली असून प्रत्येक गावामध्ये शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन सरसकट शेती, शेतपिकांचे व जनावरांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून प्रस्ताव शासनस्तरावर दाखल करा अशा सूचना दिल्या आहेत. या बैठकीस संबंधित सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांसह सर्व सज्जाचे तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक उपस्थित होते. सोबतच अतिवृष्टीने काही ठिकाणी जिवीत हानीही झाली आहे. त्यातीलच, बीड तालुक्यात असणार्‍या बोरफडी ग्रामपंचायत अंतर्गत मोहणगिरवाडी येथील कै.मोहोरबाई राजेंद्र जाधव यांचा दि.११ ऑक्टोबर रोजी रात्री अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला होता. त्यामुळे आ.संदीप क्षीरसागर यांनी त्यांच्या कुटुंबीयांची सोमवार (दि.१७) रोजी भेट घेऊन सांत्वन केले. तसेच तातडीने पाठपुरावा करत नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनातून दिली जाणारी  आर्थिक मदत एकूण ४ लाख रुपयांचा धनादेश कुटुंबीयांना सुपूर्द केला. झालेल्या व होत असलेल्या घटना अत्यंत वाईट आणि दुखःद आहेत परंतु या आलेल्या संकटावर मात करण्यासाठी आपण कायम शेतकर्‍यांच्या सोबत असल्याचा विश्वासही आ.संदीप क्षीरसागर यांनी दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा