Subscribe Us

header ads

ग्रीन व्हॅली इंटरनॅशनल स्कुल खैरगाव येथे वाचन प्रेरणा दिन साजरा--- हानमंत चंदनकर.

बीड स्पीड न्यूज 


ग्रीन व्हॅली इंटरनॅशनल स्कुल खैरगाव येथे वाचन प्रेरणा दिन साजरा--- हानमंत चंदनकर.

खैरगाव-: आज दिनांक 15 ऑक्टोबर 2022 भारताचे माजी राष्ट्रपती, एक प्रतिभावंत शास्त्रज्ञ,एक विद्यार्थीप्रिय शिक्षणतज्ञ आणि युवकांचे प्रेरणास्थान डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन या कार्यक्रमाचे आयोजन ग्रीन व्हॅली इंटरनॅशनल स्कूल खैरगाव येथे करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी लागावी तसेच त्यांच्यात वाचनसंस्कृती ची जोपासना व्हावी या अनुषंगाने आज शाळेत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले त्यात प्रामुख्याने 'एक तास वाचनासाठी' आणि 'एक भेट साहित्यिकाची' या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच एक पुस्तक शाळेसाठी' या अंतर्गत मुलांनी शाळेला विविध पुस्तके भेट म्हणून दिल्या. या कार्यक्रमाचे  प्रमुख अतिथी प्रसिद्ध साहित्यिक डॉ. बाळू दुगडूमवार आणि ग्रामीण कवी प्रा. श्री व्यंकटराव अनेराये सर हे उपस्थित होती. या कार्यक्रमादरम्यान त्यांचा शाल व श्रीफळ देऊन  सत्कार करण्यात आला. मान्यवरांचा परिचय शाळेचे सहशिक्षक श्री गणेश जांभळे सरांनी करून दिला. उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना वाचन आणि वाचनाचे महत्त्व आपल्या  भाषणातून डॉ. बाळू दुगडूमवार सरांनी व्यक्त केले. तर श्री व्यंकटराव अनेराये सरांनी विविध उदाहरणांचा आशय देत वाचनाचे महत्त्व पटवून सांगितले श्री विठ्ठल पांचाळ सरांनी एका प्रेरणादायी कवितेचे वाचन केले, तर हिंदी विभाग प्रमुख माधव भेदेकर सर यांनी किताबे कुछ कहना चाहती है... या आशयाच्या कवितेचे अर्थासह वाचन केले. या कार्यक्रमाचे सुयोग्य मार्गदर्शन शाळेचे सचिव श्री कुमुदकांत पटेल यांनी केले तर सूत्रसंचालन नवनाथ वरवटे सर,प्रास्ताविक श्री आनंद पांचाळ सरांनी केले. या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन श्री अर्जुन बैस सर व त्यांच्या टीम ने केले. अध्यक्षीय समारोप शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सरोजा धरणे मॅम यांनी केला. अशा पद्धतीने अत्यंत उत्साहात कार्यक्रमाची सांगता झाली.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा