Subscribe Us

header ads

चनई ग्रामपंचायत सदस्य हत्या प्रकरणी १७ जणांवर गुन्हा दाखल

बीड स्पीड न्यूज 


चनई ग्रामपंचायत सदस्य हत्या प्रकरणी १७ जणांवर गुन्हा दाखल


अंबाजोगाई | प्रतिनिधी-: ग्रामपंचायत सदस्यचा रेशन दुकानदारांसोबत वाद झाला या वादाची कुरापत काडून एकाची हत्या ही घटना आंबेजोगाई जवळ असलेल्या चनई येथे दसऱ्यादिवशी बुधवार दिनांक ५ ऑक्टोंबर रोजी घडली. बुधवारी सकाळी ग्रामपंचायत सदस्य आणि रेशन दुकानदार यांच्यात सकाळी वाद झाला या वादाची कुरापत काडत  सायंकाळी ग्रामपंचायत सदस्य (गोरखनाथ सिताराम घनघाव वय ४९ वर्ष) हे गावातली रमेश कदम यांच्या स्वस्त धान्य दुकानात धान्य आणण्यासाठी गेले असता तेथे रमेश कदम मुलगा सूरज व धीरज यांनी गोरखनाथ याला तु  ग्रामपंचायत सदस्य आहेस तुला रेशन कश्याला पाहिजे असे म्हणत जातीवाचक शिव्या दिल्या गोरखनाथ यांचा मुलगा नुकताच ग्रामपंचायत निवडणुकीत विजय झाला होता. त्या नंतर गोरखनाथ शेतात गेले असता याना मनोज नवनाथ ईटकर यांनी सकाळी रमेश कदम यांच्या सोबत भांडण का केले असे म्हणत जातीवाचक शिव्या दिल्या त्या नंतर सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान रमेश कदम यांनी काही गुंड बोलाऊन गल्लीत येऊन गोरख याना शिवीगाळ केली. गोरखनाथ आणि मधुकर हे त्यांच्याकडे जात असताना त्यावेळी सिमेट रस्त्यावर उभा असणाऱ्या मनोज ईटकर याने चाकूने गोरखनाथ याच्यावर वार केले. वार होताच गोरखनाथ हे गंभीर जखमी झाले नंतर नवनाथ मरगु ईटकर आणि धीरज मोरे याने लाथा बुक्क्यांने आणि विटाने मारहाण केली. तर सूरज कदम याने मधुकर मोरे यांना कोयत्याने डोक्यात वार केले. या वेळी सर्व हल्लेखोर धावून आले आणि मारहाण केली. या वेळी रमेश कदम हा गोरखनाथ याला जिवाचं मारा असं बोलुन मारत होता. भांडण ऐकून गावकरी धाऊन आले आणि त्यांनी भांडण सोडवले आणि जखमी गोरखनाथ आणि मधुकर यांना स्वाराती रुग्णालय दाखल केले. तेथे उपचार सुरु असताना सायंकाळी गोरखनाथ याचा मृत्यु झाला असे फिर्यादीत नमूद केले आहे. सदर फिर्यादीवरून मनोज नवनाथ इटकर, नवनाथ मरगु ईटकर, धीरज रमेश कदम, सूरज रमेश कदम, रमेश प्रल्हाद कदम, प्रवीण उत्तम मिसाळ, आकाश नवनाथ ईटकर, रोहित अविनाश शिनगारे, शैलेश लहू मोरे, राहुल अंकुश क्षीरसागर, सिद्धेश्वर प्रकाश पांचाळ, शरद वैजिनाथ ढगे, शुभम बंडू उमाप. धर्मराज ज्ञानोबा चौरे.सूरजनारायण उमाप. गोविंद नारायण उमाप, आणि दगडू आत्माराम मोरे, या १७ जणांवर आंबेजोगाई पोलीस ठाण्यातकलम.३०२.३२६.३२४.१२०-ब.१४३.१४७.१४८.१४९.५०४. आणि ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर आतापर्यंत शहर पोलिसांनी सहा आरोपींना ताब्यात घेतले असून इतर फरार आरोपीचा शोध चालू आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा