बीड स्पीड न्यूज
बीड (प्रतिनिधी) - शहरातील अलहुदा उर्दू शाळेत घेण्यात आलेल्या सत्कार समारंभात विद्यार्थ्यांना संबोधित करताना अॅड. सय्यद हसीब अख्तर यांनी वरील उद्गार काढले. सय्यद हसीब अख्तर यांनी नुकतेच एलएलबी चे शिक्षण प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन अॅड. पदवी मिळविली. या निमित्ताने त्यांचा सत्कार समारंभ अल हुदा उर्दू शाळेत घेण्यात आला. सय्यद हसीब अख्तर यांनी प्राथमिक शिक्षण बीड शहरातील राजीव गांधी शाळेत, माध्यमिक शिक्षण अल हुदा शाळेत तर उच्च माध्यमिक शिक्षण मिल्लिया महाविद्यालयात घेतले आहे. यानंतर औरंगाबाद येथील एम.पी. लॉ कॉलेज मधून एलएलबी करत त्यांनी वकिलीची पदवी मिळविली व तीही प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन. यामुळे शाळेचे माजी विद्यार्थी या नात्याने अल हुदा उर्दू शाळेचे मुख्याध्यापक डाॅ. सिराज खान आरजू यांनी त्यांचा हृदयी सत्कार समारंभ शाळेत घेतला व दिनांक ४ ऑक्टोबर २०२२ मंगळवार रोजी सकाळी ११:०० वाजता शाळेत सय्यद रहेबर सर, मोईज सर, हमीद खान सर, रफिक सर, युनूस खान सह अन्य शिक्षक गण, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसह विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत त्यांचा हृदयी सत्कार केला. यावेळी संबोधित करताना अॅड. सय्यद हसीब अख्तर म्हणाले की, विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास केला पाहिजे. शिक्षक वृंद चांगल्या शिक्षणासाठी सदैव तयार असतात. शिक्षक शिकवत असताना जर लक्षात आले नाही तर विद्यार्थ्यांनी शिक्षकांना विचारावे, शंकांचे निरसन करून घ्यावे. असे केल्याने गुणवत्तापूर्ण शिक्षण प्राप्त होते. चांगले व गुणवत्तापूर्ण शिक्षण प्राप्त करण्यासाठी जिद्द, चिकाटी व इच्छाशक्तीची नितांत आवश्यकता आहे. या सर्व बाबी विद्यार्थ्यांनी आपल्यात आत्मसात कराव्यात. मी आपल्या बीड शहरातीलच राजीव गांधीशाळा, अलहुदा शाळा आणि मिल्लिया महाविद्यालयात शालेय शिक्षण घेतले. यानंतर ठरविले की मला वकील व्हायचे आहे म्हणून औरंगाबाद मधील एम.पी. लॉ कॉलेज येथे एलएलबी चे शिक्षण घेऊन प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालो व आता वकील झालो आहे. आपणही आपल्याला काय करायचे आहे ते मनात ठरवून मार्गक्रमण केले तर निश्चितपणे आपल्याला जे साध्य करायचे असेल ते साध्य होऊ शकते. असे आपले मनोगत व्यक्त करताना अॅड. सय्यद हसीब अख्तर यांनी म्हटले. हसीब अख्तर हे बीड शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, उर्दू कवी आणि शायर सय्यद हसीन अख्तर यांचे पुत्र असून ज्येष्ठ समाजसेवक सय्यद जकरिया मदनी यांचे नातू आहेत.
0 टिप्पण्या