Subscribe Us

header ads

वाकनाथपुर ग्रामस्थ पुलासाठी टाकणार मतदानावर बहिष्कार!

बीड स्पीड न्यूज 

प्रतिनिधी नवनाथ गोरे

वाकनाथपुर ग्रामस्थ पुलासाठी टाकणार मतदानावर बहिष्कार



वाकनाथपुर | प्रतिनिधी-:  बीड तालुक्यातील आणि गेवराई मतदार संघातील गावाचे खुप हाल चालु आहेत कोठे जाण्यासाठी रस्ते नीट नाहीत कोठे रस्ते मंजुर झाले तर काम पुर्ण होत नाहित आणि कोठे काम झाल तर एका महिन्यात रस्ता जश्यास तसा होतो. लोक प्रतिनिधी फक्त मतदान मागण्यासाठी येतात आश्वासने देतात परत जातात आणि पुढील मतदान येईपर्यंत त्या गावाकडे लक्ष देत नाहीत अश्याच प्रकारे बीड पासुन जवळच असणारे मौजे वाकनाथपुर या गावाला कोणत्याही बाजूने रस्ता नाही वाकनाथपुर फाटा ते म्हाळस जवळा हा रस्ता मंजुर आहे पण तीन वर्षापासून या रस्त्याचे काम अर्धवट करून बंद केले आहे. कोणतेही वरीष्ठ किव्हा लोकप्रतिनिधी रस्ता का बंद आहे याची चौकशी देखिल करत नाहीत तसेच वाकनाथपुर या गावाला तीन बाजूने नद्या आहेत नदीला पाणी असल्याने गावातून बाहेर निघण्यासाठी खुप त्रास सहन करावा लागत आहे. कोणी रात्री अपरात्री दवाखान्यात घेउन जायचे असेल तर गाडी बैलात नदी पलीकडे घेऊन जावे लागते मुलांना शाळेत जाण्यासाठी नदीचे पाणी पार करावे लागते नदीला जास्त पाणी आले तर शाळेतली विद्यार्थ्यांला शाळेत जाता येत नाही कोणते ही वाहणे गावात येत नाहीत आणि गावातूनच बाहेर जात नाहीत या गावाला अनेक लोकप्रतिनिधींनी येऊन आश्वासने दिली काही दिवसात पुलाचे काम मार्गी लावू असे आश्वासने दिली आणि परत या गावाकडे कोणी बघितले देखिल नाही म्हणुन या गावांतील नागरिकांनी या वर्षी येणाऱ्या सर्व मातदानावर बहिष्कार टाकण्यात येणार असल्याची चर्चा जोरात चालू आहे. पुलाचे काम मार्गी लावा तरच मतदान करणार नसता कोणीही मतदान करायचे नाही अशी चर्चा आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा