Subscribe Us

header ads

बुद्धांच्या सर्वव्यापी विचारातच अखंड विश्वातील मानवांचे कल्याण सामावले आहे -- नगरसेवक अँड विकास जोगदंड

बीड स्पीड न्यूज 


बुद्धांच्या सर्वव्यापी विचारातच अखंड विश्वातील मानवांचे कल्याण सामावले आहे -- नगरसेवक अँड विकास जोगदंड



बीड (प्रतिनिधी) 5 ऑक्टोंबर युगान युगे प्रस्थापित धर्माच्या पशुतुल्य नितिनियमाने रंजल्या, गांजल्या, हतबल, शोषित, पीडित बहुजन समाजाला न्याय द्यायचा असेल तर धर्मांतराशिवाय पर्याय नाही असा निश्चय  विश्वरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार परम पूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी करत 1935 साली नाशिक जिल्ह्यातील येवले मुकामी धर्मांतराची घोषणा केली. आणि मानवाचे मानवाशी असलेले जगातील नाते हा बुद्ध धम्माचा केंद्रबिंदू असून बुद्ध धम्माचे ते पहिले अधिष्ठान आहे. बुद्धांचा धम्म दुःखाचे अस्तित्व मान्य करतो तसेच दुःखाचे निरसन करण्यावरही भर देतो संबंध मानवाच्या कल्यानाचा मार्ग बुद्ध धम्मातचं आहे. म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या पाच लाख अनुयाया सह 14 ऑक्टोंबर 1956 साली अशोका विजयादशमी च्या दिवशी धर्मांतर केले. आणि आम्हाला समतेवर आधारीत सर्वसमावेशक बुद्ध धम्म देऊन समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता या मानवी स्वतंत्र्याच्या उद्गोशाचे एक नवे पर्व देशात प्रस्थापित करत ऐतिहासिक क्रांती करत धमचक्र प्रवर्तन केले. तथागत भगवान गौतम बुद्धांच्या सर्वव्यापी विचारातच अखंड विश्वातील मानवांचे कल्याण सामावले असून सद्यस्थितीला बुद्धांचे तत्त्वज्ञानच मानवी मूल्य जोपासत असल्याचे प्रतिपादन भिम स्वराज्य सेनेचे संस्थापक/अध्यक्ष तथा नगरसेवक अँड विकास जोगदंड यांनी भिम स्वराज्य संघटनेच्या विभागीय कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या धम्मजागर कार्यक्रमाप्रसंगी बोलताना केले. यावेळी प्रथमत: विश्वशांती दूत करुणेचे महासागर तथागत भगवान गौतम बुद्ध आणि विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी जेष्ठ धम्मउपासक किसन जोगदंड, मंगेश जोगदंड, सचिन जाधव, राजेशभाई कोकाटे, गोरख जोगदंड,हिरामण गायकवाड,महादेव वंजारे, तथागत प्रतिष्ठाचे आदर्शराजे जोगदंड,सह भिम अनुयायी मोठया संख्येने उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा