Subscribe Us

header ads

वाकनाथपुर फाटा ते म्हाळस जवळा या रोड च्या गुत्तेदराचा मनमानी कारभार

बीड स्पीड न्यूज 

प्रतिनिधी नवनाथ गोरे

वाकनाथपुर फाटा ते म्हाळस जवळा या रोड च्या गुत्तेदराचा मनमानी कारभार




वाकनाथपुर | प्रतिनिधी -:   बीड तालुक्यातील आणि गेवराई मतदार संघातील गावांना कोणी वाली राहिलाच नाही कोठे नदीवर पुल नाहीत कोणत्या गावाला रोड नाहीत आणि काही रोड मंजुर असुन तीन तीन वर्ष अर्धे कामे करुन सोडुन दिले आहेत. कोणीही या गुत्तेदारांना विचारत ही नाही वाकनाथपुर फाटा ते म्हाळस जवळा या रोड चे काम गेले तीन ते साडेतीन वर्षापासून बंद आहे. या रोडचे गुत्तेदार जे आहेत त्यांनी कोणते अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी विचारत ही नाहीत इतक्या वर्षापासून रोड चे काम बंद आहे तरी लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठअधिकारी या गुत्तेदारनां का विचारतं नाहीत हा मोठा प्रश्न आहे. या रोड ला पाणी जमा होऊन गुडघ्या पर्यंत खड्डे झाले आहेत गावातली नागरीकांना पायीही चालता येत नाही. या रोड चे गुत्तेदार जाणूनबुजून गावकऱ्यांचे हाल करत असल्याचे चित्र दिसत आहेत या गुत्तेदारला अनेक वेळेस फोन करून रोड चे काम सुरू करण्याची मागणी करून देखिल देखील फक्त आश्वासने भेटत आहेत. रोड चे काम सुरू होत नाही तरी वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी या रोड च्या गुत्तेदार यांना रोड चे काम लवकरात लवकर सुरू करण्याचे आदेश देण्यात यावे नसता गावकऱ्यांना आंदोलन करावे लागेल असे समस्त गावातली नागरीकांची मागणी आहे. आणि या गावाला येण्यासाठी मुख्य रस्त्यावरील नदीवर पुल नाही या पुलाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावा कारण नदीला पाणी असल्यास शाळेतली मुलाना शाळेत जाता येतं नाही आणि गावकऱ्यांना ही गावातून बाहेर निघतात येत नाही कोणाला वेळेवर दवाखान्यात दाखल करतात येत नाही तरी या गावच्या समस्या लवकरात लवकर सोडवाव्या अशी मागणी समस्त गावकरी करत आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा