Subscribe Us

header ads

ओला दुष्काळ जाहीर करण्याची राष्ट्रवादी युवक काँग्रेसची तहसीलदार यांच्याकडे मागणी

बीड स्पीड न्यूज 

ओला दुष्काळ जाहीर करण्याची राष्ट्रवादी युवक काँग्रेसची तहसीलदार यांच्याकडे मागणी

अतिवृष्टीने झालेल्या पिकांचे नुकसानीचे पंचनामे करून ओला दुष्काळ जाहिर करून तातडीने मदत द्या - गोविंद कराड

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- तालुक्यात यावर्षी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणावर शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. यामध्ये शेतकर्‍यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तरी प्रशासनाने तातडीने पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी माजी मंत्री आ. धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वाल्मिक अण्णा  कराड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गोविंद कराड यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, परळी विधानसभा मतदारसंघ अंतर्गत प्रत्येक मंडळामध्ये परतीच्या पावसामुळे शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नेमके पीक काढणे वेळी सोयाबीन या पिकाचे व उभ्या असलेल्या कापूस या पिकाचे या अतिवृष्टीमुळे  100 टक्के नुकसान झाले आहे.  तरी प्रशासनाने तातडीने पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करावा, तसेच पिक विमा द्यावा, पिक विम्याच्या ऑनलाईन तक्रारीची जाचक अट रद्द करून सरसकट पिक विमा द्यावा  व संकटाचा सापडलेला शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करावी अशी मागणी तहसीलदार यांच्याकडे राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी परळी वैजनाथ यांनी केली आहे.  दरम्यान नायब तहसीलदार बाबुराव रुपनर यांनी निवेदन स्वीकारले आहे. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गोविंद कराड, शहराध्यक्ष सय्यद सिराज, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका सरचिटणीस भरत शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या शहराध्यक्ष सोफिया नबरदार, युवती तालुकाध्यक्ष शिल्पा मुंडे, संदीप दिवटे, बळीराम नागरगोजे, शितलदास आरसुळे, आकाश रोडे, विद्यार्थी आघाडी ऋषिकेश राठोड, अभि गित्ते, शंकर कोचे, राहुल भोसले,प्रदीप घाडगे, बिलाल शेख, गोपीनाथ गंजेवार, अनिलराजे कदम, मोईन काकर, अफरोज काकर, श्रीमंत मुंडे, अंकुश शिंदे, सिद्धार्थ आदमाने, प्रफुल आदमाने, सोमेश मुंडे, बाळासाहेब गुट्टे, श्रीमंत मुंडे, शाम कराड, सचिन कराड, नजोमोदींन शेख, गजेंद्र मगर, रंजीत कदम, गणेश सुरवसे, बिबीशन आरसुळे, अजित शिंदे, एस.एम. गीते आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा