Subscribe Us

header ads

मिल्लिया महाविद्यालयाचा वन्यजीव सप्ताह मध्ये सहभाग

बीड स्पीड न्यूज 


मिल्लिया महाविद्यालयाचा वन्यजीव सप्ताह मध्ये सहभाग

बीड: येथील मिल्लिया कला, विज्ञान व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभागाने दिनांक 06 ऑक्टोंबर 2022 रोजी वन्यजीव विभाग, नायगाव (मयूर) यांनी आयोजित केलेल्या " वन्यजीव सप्ताह-2022" याकार्यक्रमात सहभाग घेतला. वन्यजीव अधिकारी श्री. ए.आर.सागुळे यांनी मोरांचे संवर्धन व संगोपन याबद्दल विद्यार्थ्यांना सखोल माहिती दिली. महाविद्यालयाचे प्राणीशास्त्राचे प्रोफेसर डॉ. शेख फिरोज यांनी वन्यजीव संवर्धन व संगोपन या विषयावर व्याख्यान दिले. वन व वन्यजीवांचे संरक्षण करणे हे समाजाचे सुद्धा कर्तव्य असून विद्यार्थ्यांनी वन्यजीवांच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्यावा असे सांगितले. यावेळी वनपाल श्री. बागवान बाबामिया, वनपाल सौ. फरताळे मॅडम, वनपाल सौ. पवार मॅडम, वनरक्षक श्री. शेळके, वनमजूर श्री. कदम, प्राणीशास्त्राचे प्राध्यापक डॉ. सायरी अब्दुल्ला, प्राध्यापिका डॉ.संध्या बीडकर, प्रयोगशाळा सहाय्यक शेख अब्दुल्ला तसेच विद्यार्थी- विद्यार्थ्यांनी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहम्मद इलयास फाजील  व प्राणीशास्त्राचे प्राध्यापक डॉ. काझी सलीम यांचे सहकार्य लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा