Subscribe Us

header ads

श्री शाहिनाथ विक्रमराव परभणे साहेब राष्ट्रीय उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित

बीड स्पीड न्यूज 


श्री शाहिनाथ विक्रमराव परभणे साहेब राष्ट्रीय उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित

बीड | प्रतिनिधी दि.२४ -: इकॉनॉमिक ग्रोथ फाउंडेशन इंटरनॅशनल बिझनेस कौन्सिल आणि इंडियन सॉलिडॅरिटी कौन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण, सामाजिक आणि आर्थिक विकास यामध्ये कामकाज करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन म्हणून दिला जाणारा मानाचा राष्ट्रीय उद्योगरत्न पुरस्कार २०२२ दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री.कं.एल. गंजू ओ.सी.व्ही.सी.(सीडीआर),कॉन्सुल जनरल (HY) पदमश्री डॉ. जितेंदर सिंह शंटी, माजी विधानसभा सदस्य, दिल्ली सरकार आणि संस्थापक शहीद भगत सिंग सेवा दल यांच्या हस्ते व श्री.आर.के.अग्रवाल, श्रीमती मेघा वर्मा आंतरराष्ट्रीय उद्योजक, श्री ओ.पी. सक्सेना अध्यक्ष अखिल भारतीय वकील मंच, सुमन सिंग सदस्य स्टील ग्राहक परिषद भारत सरकार स्टील मंत्रालय यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये श्री साईराम अर्बन मल्टिस्टेटचे चेअरमन तथा श्री साईराम उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष मा.शाहिनाथ विक्रमराव परभणे (साहेब) यांना मानाचा राष्ट्रीय उद्योगरत्न पुरस्कार २०२२ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.परभणे साहेबानी सामाजिक आर्थिक कामामध्ये  केलेल्या कामकाजाची नोंद राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात नोंद झाल्याचे या मिळालेल्या पुरस्कारातून सिद्ध होत आहे.यापूर्वी संस्थेला विविध प्रकारचे पुरस्कार मिळालेले आहेत.सदरील मिळालेल्या पुरस्कारामुळे नक्कीच अजून सामाजिक व आर्थिक कामकाज करण्यासाठी पुरस्काराच्या स्वरूपात एक नवी ऊर्जा मिळालेली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा