Subscribe Us

header ads

दारूच्या नशेत नालित पडून एकाचा मृत्यू

बीड स्पीड न्यूज 


प्रतिनिधी नवनाथ गोरे


दारूच्या नशेत नालित पडून एकाचा मृत्यू

वाकनाथपूर | प्रतिनिधी -: बीड तालुक्यांतील ईट फाट्यावर  एक साठ वर्षीय पुरुष दारूच्या नशेत रोड च्या बाजुस पडलेला होता अती दारू सेवन केल्याने त्याला चालता येत नव्हते रात्री घरी जाण्याचा प्रयत्न करत असताना बाजूलाच असलेल्या नालित त्याचा तोल गेला आणि रात्र असल्याने त्याला कोणी पाहिले नाही व नालीत पाणी असल्याने त्यात त्याचा मृत्यु झाला (दामू राणू इंगोले वय ६० वर्ष रा.सावरगाव खुर्द तालुका माजलगाव जिल्हा बीड) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. दामू हे ईट येथील दिनकर शिंदे यांच्याकडे कामाला होता त्याला दारुचे व्यसन होते. या दारूच्या नेशेत गुरुवार रात्री घरी जाताना रस्त्याच्या बाजूच्या नालित त्याचा तोल गेला रात्री अंधार असल्याचे आणि पाऊस चालु असल्याचे त्याच्याकडे कोणाचे लक्ष गेले नाही रात्र भर नालीत राहील्याने त्याचा मृत्यू झाला. ही बाब आज दिनांक ७ ऑक्टोंबर वार शुक्रवार रोजी सकाळी ही बाब निदर्शनास आली लगेच ही घटना पिंपळनेर पोलिस ठाण्यात कळवण्यात आली. घटना समजताच पिंपळनेर पोलिस ठाण्याचे ए एस आय गर्जे आणि पोलीस नाईक घुंबरे यांनी घटनास्थळी धाव घेतली प्रेत नालितून बाहेर काडून पंचनामा केला. आणि प्रेत शवविच्छेदन करण्यासाठी बीड येथील जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले. शवविच्छेदन झाल्या नंतर प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले असून पिंपळनेर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा