Subscribe Us

header ads

भूमीपूत्रांची आशी ही दिवाळी...

बीड स्पीड न्यूज 


भूमीपूत्रांची आशी ही दिवाळी...


परळीचे डाॅ.रविंद्र प्रकाश जगतकर यांची सामाजिक बांधिलकी ; स्वखर्चाने आयुष्यमान भारत योजना व महात्मा ज्योतीराव फूले  जन योजनेचे मार्गदर्शनासह कार्डचे वाटप

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- ठाणे व रायगड जिल्ह्याचे जिल्हा समन्वयक तथा परळी शहरातील जगतकर गल्ली येथील भूमिपुत्र डाॅ.रविंद्र प्रकाश जगतकर यांनी सामाजिक बांधिलकीतून वैद्यकीय क्षेत्रात मागील अनेक वर्षांपासून "रूग्णसेवा हीच ईश्वर सेवा" मानत कार्य करत 
आहेत. त्यांनी दिवाळीच्या सुट्टीत आपल्या गावी आल्या नंतर तालुक्यातील मांडवा, मालेवाडी, मालेवाडी तांडा येथील नागरिकांचे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतीराव फूले जण आरोग्य योजनाबद्दल माहिती, नाव नोंदणीसह कार्डचे स्व; खर्चातून वाटप करून सामाजिक बांधीलक जपली आहे.  यामाध्यमातून दोन्ही योजनेचा लाभ मिळवून दिला आहे. 

त्याच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच त्यांनी अशा प्रकारे समाजसेवा करून अगळी वेगळी दिवाळी साजरी केली. परळीचे भूमिपुत्र, ठाणे व रायगड जिल्ह्याचे जिल्हा समन्वयक डाॅ.रविंद्र प्रकाश जगतकर हे आपल्या गावी आल्यानंतर त्यांनी आपल्या तालुक्यातील ग्रामीण भागातील तपासणी केल्यानंतर येथील गावकऱ्यांना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जण आरोग्य योजना व महात्मा ज्योतीराव फूले जण आरोग्य योजना आशा काही सरकारी योजनांचे लाभ मिळत नाहीत हे लक्षात घेताच डाॅ. रविंद्र प्रकाश जगतकर यांनी परळी तालुक्यातील विविध ग्रामीण भागात योजनेची माहिती व आयुष्यमान भारत कार्ड वाटप कॅम्पचे आयोजन करून नागरिकांचे 5 लाखाचे सरकारी इंश्योरेंसचे कार्ड वाटप केले. महात्मा जोतिराव फूले जन आरोग्य योजनां व आपले पिवळे, आणि केशरी राशन कार्ड हेच आपले दीड लाखाचे  हेल्थ 

इंश्योरेंस आहे आशी माहीती डॉ. रवींद्र प्रकाश जगतकर यांनी गावातील ग्राम स्थाना दिली. त्यांनी स्व-खर्चातून लोकांना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे कार्ड वाटप केले. तसेच त्यांनी तालुक्यातील नागरिकांनी शासकीय योजनाचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. दिवाळीच्या सुट्टीत ठाणे व रायगड जिल्ह्याचे जिल्हा समन्वयक तथा परळी शहरातील जगतकर गल्ली येथील भूमिपुत्र डाॅ.रविंद्र प्रकाश जगतकर हे आपल्या गावी आल्या नंतर रुग्णसेवा व समाजसेवा करून सामाजिक बांधिलकीतून वैद्यकीय क्षेत्रात मागील अनेक वर्षांपासून "रूग्णसेवा हीच ईश्वर सेवा" मानत त्याच्या या कार्याची सर्वत्र कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा