Subscribe Us

header ads

डॉ.संतोष मुंडे या बीड जिल्ह्याच्या भुमीपुत्राचा गोव्यात पुरस्काराने सन्मान

बीड स्पीड न्यूज 


डॉ.संतोष मुंडे या बीड जिल्ह्याच्या भुमीपुत्राचा गोव्यात पुरस्काराने सन्मान

मराठवाडा व माझ्यासाठी हि अत्यंत गर्वाची बाब आहे-आ.बच्चू कडू
                                                             ‌                                                    ‌   ‌                                              बीड/प्रतिनिधी/ परळी तालुक्यातील नाथ्रा या छोट्याशा गावात डॉक्टरच्या पोटी जन्माला आलेले पुढे स्वतःही डॉक्टर म्हणून वैद्यकीय व्यवसायात आलेले संतोष मुंडे यांना शालेय-महाविद्यालय जीवनापासूनच सामाजिक कार्याची प्रचंड आवड असल्याने ते सामाजिक कार्यापासून कधीच बाजूला सरकले नाहीत.वडील डॉ.एकनाथराव मुंडे हे परळी शहर-ग्रामीण भागासह बीड जिल्ह्यातील एक नामांकित कान-नाक-घसा तज्ञ डॉक्टर म्हणून परिचित.परंतु तेही सामाजिक विचाराने प्रेरित असल्याने त्यांनी मुलगा संतोष यांना कधीच केवळ वैद्यकीय व्यवसाय करावा असे बंधन न घालता आपला व्यवसाय सांभाळून तुला जे-जे चांगले करता येईल ते करायला माझी कधीच हरकत असणार नाही असे सांगितल्यामुळे मुळातच सामाजिक कार्याची आवड असलेल्या संतोष मुंडे यांना यामुळे अजूनच पुष्टी मिळाली, नव्हे एक प्रकारे बळच मिळाले. नाथ्रा गावाच्या मातीतच सामाजिक-राजकीय कार्याची चळवळ दडलेली होती म्हणून तर या छोट्याशा खेडेगावाने गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या सारख्या राष्ट्रीय दर्जाचा लोकनेता जन्माला घातला. तर त्यांच्या या प्रवासाच्या मदतीला गावकऱ्यांसह वडील बंधू स्व.पंडित अण्णा मुंडे यांनी खंबीर साथ दिली म्हणून या गावाने आणि पुढे राज्यातील जनतेने अगदी केंद्रीय मंत्री आणि उद्याचे मुख्यमंत्री इथपर्यंत गोपीनाथरावजी मुंडे यांना नेऊन ठेवले.पुढे कालांतराने एका मागोमाग पंडित‌आण्णा आणि गोपीनाथरावजी मुंडे हे दोन्ही बंधू कालवश झाल्यानंतर परिवारातील-घरातील धनंजय-पंकजा-प्रीतम आणि अलिकडे अजय मुंडे बंधु-भगिणींनी स्व.पंडित‌आण्णा मुंडे आणि गोपीनाथरावजी मुंडे या दोन्ही बंधूंच्या आशीर्वादाने,राजकीय वरदहस्ताने व आपल्या कष्टाने बीड जिल्ह्याच्या-महाराष्ट्राच्या आणि केंद्राच्या राजकारणात आपापल्यापरीने चुणूक दाखवत राजकीय क्षेत्रात आपले नाव केले.पण हे करत असतानाच याच नाथ्रा गावच्या मातीत राजकारण अगदी थोडं परंतु समाजकारणाचं घोडं अगदी तन-मन-धनाने दामटणारे व्यवसायाने डॉक्टर असतानाही दिव्यांग यांच्यासाठी आपले काहीतरी देणे लागते एवढ्या एकाच ध्यासाने,ध्येयाने प्रेरीत होऊन पुढे सबंध महाराष्ट्रातील दिव्यांगांचे एकमेव कैवारी असणाऱ्या आ.बच्चू कडू यांच्या संपर्कात येऊन त्यांच्या कार्याने प्रेरित होऊन डॉ. संतोष मुंडे यांनी यापुढे आपले उर्वरित आयुष्य आपले वैयक्तिक जीवन जगताना आता दिव्यांगांसाठीही जगायचे,मागे हटायचे नाही अशी खुणगाठ मनाशी बांधून आ.बच्चू कडू यांच्या खांद्याला खांदा कार्य  आहे.त्यापेक्षा आणखीनच जोमाने सुरू केले ते आजतागायत कधी मागे पाहिलेच नाही.

अल्पावधीतच मराठवाड्याचा बच्चू कडू म्हणून डॉ.संतोष मुंडेंची ओळख निर्माण झाली

दिव्यांगांप्रतीचे काम दिवसेंदिवस वाढतच गेल्याने अल्पावधीतच डॉ.संतोष मुंडे यांना मराठवाड्याचा दिव्यांगाचे कैवारी तथा मिनी बच्चू कडू म्हणून ओळखले जाऊ लागले.ही ओळख निर्माण होत असतानाच राजकारणात चाणाक्ष म्हणून ज्यांची महाराष्ट्रभर ओळख आहे असे माजी मंत्री धनंजयजी मुंडे यांनी नाथ्रा गावात आता राजकारणात नाही.परंतु सामाजिक क्षेत्रात एक हिरा जन्म घेतोय,चमकतोय हे ओळखून शर्थीच्या प्रयत्नाने मनधरणी करून आपले कसब पणाला लावून डॉ.संतोष मुंडे यांना पुर्णवेळ राजकारणात खेचले आणि लवकरच त्यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष करून राजकारणात सक्रिय केले.तिथेही अल्पावधीतच राजकारण थोडे परंतु आपली नाळ ज्याच्याशी जन्मजात बांधली आहे अशा समाजकारणाचे घोडे दामटत डॉ.मुंडे यांनी प्रदेश कार्यकारणीत आणि पवार कुटुंबातही आपली छाप पाडली खरी,परंतु हा आपला मार्गच नसून आपला मूळ मार्ग हा समाजकार्याचा आहे.राजकारण हे त्या नंतर कामापुरते आहे.हे ओळखून जनसामान्यांच्या व स्वतःच्या कामापुरते मोजके राजकारण करत डॉ.मुंडे यांनी आपले आ.बच्चू कडू यांच्याशी असलेले संबंध तीळमात्र कमी न होऊ देता दिवसेंदिवस ते वृद्धींगत करत राज्यातील दिव्यांग प्रश्नांची चळवळ थेट केंद्रात नेली.ती गल्ली ते दिल्ली पोहोचण्याचे मोठे काम माजी मंत्री बच्चू कडू यांच्या खांद्याला खांदा लावत सुरूच ठेवले आणि मग समाजकार्यात उत्तुंग भरारी मारलेल्या संतोषजी मुंडे यांची दिव्यांगांप्रतीची आस-भूमिका पाहून बच्चू कडू यांनीही राज्य आणि केंद्रातील प्रत्येक बैठकीला डॉ.मुंडे यांना सोबत ठेवून कसे दिव्यांगांचे जास्तीत जास्त प्रश्न सोडवून घेता येतील एवढेच मनी ठेवून आपले कार्य सातत्याने सुरू ठेवले आणि आज त्याच कार्याची पावती म्हणून या मराठवाड्याचे मिनी बच्चू कडू तथा दिव्यांगाचे कैवारी म्हणवणाऱ्या डॉ. संतोषजी मुंडे यांच्या एकंदरीत समाजकार्यातील  गरुडझेप  पाहून गोवा सरकारने राजधानी पणजी येथे मुख्यमंत्री मा.डॉ. प्रमोदजी सावंत यांच्या हस्ते देण्यात आला.डॉ.संतोषजी मुंडे यांचे आजपर्यंतच एकंदरीत सामाजिक कार्य पाहता आणि विशेषतः त्यांची दिव्यंगांप्रतीची ओढ आणि आस पाहता त्यांचा सन्मान करण्याचे महाराष्ट्र सरकारला सुचले नाही ही जरी दुर्दैवाची बाब असली,तरी परराज्यात म्हणजेच गोव्यासारख्या समृद्ध-संपन्न राज्याच्या वतीने मला बारक्या भावाच्या ठिकाणी असणाऱ्या डॉ. संतोष मुंडे या सामाजिक कार्यकर्त्याचा गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते आज एवढ्या मोठ्या पुरस्काराने सन्मान-गौरव झाला ही बाब जेवढी प्रहार पक्ष-संघटना, कडू परिवार यांच्यासाठी भूषणावह आहे.तेवढीच ती मराठवाड्यासाठीही भूषणीय आहे असे गौरवउद्गार डॉ.संतोष मुंडे यांच्या बाबतीत माजी मंत्री आ.बच्चू कडू यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना काढले.Young Politician And Social Activists” यासाठी Idols Of Maharashtra या मोठ्या मान-सन्मानाच्या पुरस्काराने सन्मानित सन्मानित करण्यात आले.या मिळालेल्या पुरस्काराने मुळ गाव नाथ्रा,परळी, संपूर्ण बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील प्रत्येक स्तरातून डॉ.संतोष मुंडे यांच्यावर अगदी भरभरून अभिनंदन-कौतुकाचा सोशियल मिडीयासह विविध माध्यमातून मोठा वर्षाव होत असुन त्यांचे माजी मंत्री बच्चु कडू यांच्यासह माजी मंत्री पंडीत रावजी दौंड,आ.धनंजय मुंडे, खा.डॉ.प्रितम मुंडे, भाजपाच्या राष्ट्रीय सचिव माजी मंत्री पंकजा मुंडे, मा.आ.संजय दौंड, पृथ्वीराज साठे आणि मित्र परिवाराकडूनही अभिनंदन करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा