Subscribe Us

header ads

दसरा मेळाव्याला बीडचे शेकडो शिवसैनिक मुंबई येथे जाणार - गोरख शेळके

बीड स्पीड न्यूज 


दसरा मेळाव्याला बीडचे शेकडो शिवसैनिक  मुंबई येथे जाणार - गोरख शेळके

बीड प्रतिनिधी / दि.03 दसरा मेळाव्याला बीड तालुक्यातील व शहरातील शेकडो मावळे मुंबई येथे राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे  यांनी आयोजित केलेल्या मेळाव्याला जाणार आहेत, शेतकऱ्यांचा दसरा निश्चितपणे मुख्यमंत्री गोड करतील अशी अपेक्षा आहे, कमी काळामध्ये धाडसी निर्णय घेणारे, व सर्व सामान्य जनतेला व शिवसैनिकांना समजून घेणारे, अशी नामदार एकनाथ शिंदे यांची ख्याती आहे,  दसऱ्या निमित्त सोने मुंबई येथे लुटणार आहेत, महाराष्ट्रातील शेतकरी या नवीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मोठ्या आशेने बघत आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर योग्य निर्णय घेऊन न्याय निवडा करावा तसेच बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेती विषयक मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा व कलावंत कोट्यातून बीड जिल्ह्याला एक विधान परिषदेची, जागा भेटावी यासह विविध विषयावर दसरा मेळावा निमित्त मुंबईला गेल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याची माहिती दिली आहे, दसरा मेळावा ला जाणारे बीड येथील कट्टर शिवसैनिक तथा माजी सरपंच गोरख शेळके वांगीयांनी सांगितले आहे,बीड जिल्ह्यातून हजारो शिवसैनिक मुंबई येथे होत असलेल्या मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्याला जाणार असल्याची माहिती यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा