Subscribe Us

header ads

निवेदनानंतर नऊ महिन्यांनी एक गतिरोधक काढलाउर्वरित तीन गतिरोधके काढायला सत्तावीस महिने घेऊ नये - एस.एम.युसूफ़

बीड स्पीड न्यूज 

निवेदनानंतर नऊ महिन्यांनी एक गतिरोधक काढला
उर्वरित तीन गतिरोधके काढायला सत्तावीस महिने घेऊ नये - एस.एम.युसूफ़




बीड (प्रतिनिधी) - बशीरगंज ते तेरवी लाईन पर्यंत टाकण्यात आलेले अनावश्यक व ञासदायक चार गतिरोधक काढण्यात यावेत म्हणून जानेवारी २०२२ ला बीड नगर परिषदेत निवेदन दिले होते. यानंतर नऊ महिन्यांनी चार पैकी थोरातवाडी समोरचा फक्त एक गतिरोधक नुकताच काढण्यात आला. उर्वरित तीन गतिरोधक मात्र तसेच सोडून देण्यात आले. तेव्हा आता ही तीन गतिरोधके काढण्यासाठी बीड नगरपरिषदेने सत्तावीस महिने घेऊ नये अशी बोचरी टीका या गतिरोधकांबाबत पाठपुरावा करणारे मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून केली आहे. याविषयी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की, तीस वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर बशीरगंज ते जिल्हा रुग्णालय व जुने एसपी ऑफिस ते तेरवी लाईन पर्यंत चा रस्ता व्यंगात्मक निषेध आंदोलन, भीक मांगो आंदोलन आणि बेशरम अंघोळ आंदोलनानंतर गेल्या वर्षी एकदाचा बनविण्यात आला. चांगला बनविलेल्या रस्त्यावर कुणाच्यातरी उरफाट्या डोक्यातून गतिरोधक टाकण्याची आयडियाची कल्पना आली माहित नाही. परंतु रस्ता झाल्यानंतर काही महिन्यांनी नेमक्या कोणत्या उपटसुंभाच्या इशाऱ्यावरून या रस्त्यावर न्यू सुंदर मेडिकल समोर, थोरातवाडी समोर, गणेश नगरच्या कॉर्नरला आणि राजेंद्र जोगदंड यांच्या घरासमोर अशी चार अनावश्यक व अत्यंत चुकीच्या पद्धतीने गतिरोधके टाकण्यात आली. याचा त्रास गेल्या अनेक महिन्यांपासून वाहन चालकांना तर होतोच आहे शिवाय पादचाऱ्यांनाही होतो आहे. मात्र याचे कुठलेही सोयरसुतक बीड नगर परिषदेला नसल्याचे दिसून आल्याने जानेवारी २०२२ ला या रस्त्यावरील ही चारही अनावश्यक व चुकीची गतिरोधके काढण्यात यावी म्हणून निवेदन दिले होते.  तसेच याविषयी वृत्तपत्रातून बातम्याही प्रकाशित करण्यात आल्या होत्या. याची दखल बीड नगर परिषदेने नऊ महिन्यानंतर घेतली आणि फक्त थोरातवाडी समोरचा एक गतिरोधक काढण्यात आला. बाकीचे तीन सोडून देण्यात आले आहेत. ही तीनही गतिरोधके काढणे सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. तिन्ही गतिरोधके अत्यंत चुकीच्या पद्धतीने व त्रासदायक अशी टाकण्यात आलेली आहे. तेव्हा ही गतिरोधके सुद्धा लवकरात लवकर काढून टाकण्यात यावी. नऊ महिन्याला एक याप्रमाणे उर्वरित तीन गतिरोधके काढण्यास सत्तावीस महिने घेऊ नये. अशी बोचरी टीकाही मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पञकातून केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा