Subscribe Us

header ads

कमी पटसंख्या हे कारण देऊन सरकारचा शाळा बंद करण्याचा घाट -- लोकजनशक्ती पार्टी

बीड स्पीड न्यूज 


कमी पटसंख्या हे कारण देऊन सरकारचा 
शाळा बंद करण्याचा घाट -- लोकजनशक्ती पार्टी


अंबाजोगाई प्रतिनिधी दि ३ -: शिक्षण हक्क कायद्यातील कलम 4 नुसार वस्ती तांडा पाडा एक किलोमीटर अंतरावर पाचवीपर्यंत आणि तीन किलोमीटर अंतरावर आठवीपर्यंतचे शिक्षण मिळाले पाहिजे हा कायदा भारताच्या सर्वोच्च असणाऱ्या संसदेत संमत झालेला असतानाही महाराष्ट्र शासनाने कमी पटसंख्या (विद्यार्थी संख्या) कारण देऊन शाळा बंद करण्याचा निर्णय अत्यंत दुखद आणि वेदनादायी असल्याचे जाणवले असे केल्यास मुलांना खूप अंतर पायी पायी चालावे लागणार आहे. वाटेत घनदाट जंगल. ओढे .नदी नाले .महामार्ग. रेल्वे रूळ .खडी .असतात डोंगराळ भागात मुसळधार पाऊस कोसळत असतो शाळा दूर अंतरावर गेली की मुलांचे शिक्षण थांबेल 6 ते 14 वयोगटातल्या मुलांना तीन किलोमीटर पेक्षा जास्त अंतर चालायला लावू नये असे सर्वोच्च न्यायालयाने 8/9/ 2017 रोजी दिलेल्या निकालात म्हटले आहे. आदिवासी वंचित बहुजन आणि दलित मुलांना शिक्षणाचा अधिकार नाकारला जाईल याची भीती वाटते असे जर झाले तर शाळाबाह्य मुलांची संख्या वाढेल बालमजुरी आणि मुलींचे बालविवाह वाढतील अशी भीती वाटते. शाळा बंद करणे म्हणजे संविधानाची पायमल्ली केल्यासारखे होईल तरीही मुख्यमंत्री महोदयांना उपजिल्हाधिकारी साहेब अंबाजोगाई यांच्यामार्फत रीतसर निवेदन देण्यात येत आहे. यावरही शासनाने जर शाळा बंद केल्या तर लोकजनशक्ती पार्टीच्या वतीने पूर्ण मराठवाड्यात आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा लोक जनशक्ती पार्टीच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी लोकजनशक्ती पार्टीचे विद्यार्थी तालुका अध्यक्ष आदित्य भैय्या चौरे, लोकजनशक्ती पार्टीचे अंबाजोगाई शहर अध्यक्ष प्रदीप भाऊ गुंडरे, दिनेश घार टिल्लू, जोगदंड करण मोरे, अविनाश वागमारे, निखिल कांबळे व इतर निवेदन देताना. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा