Subscribe Us

header ads

मुकेश लक्ष्मण कानडे यांस श्री साईराम अर्बन मल्टीस्टेटला कर्जापोटी दिलेला धनादेश न वटल्याने २ वर्ष शिक्षा व दंड

बीड स्पीड न्यूज 


मुकेश लक्ष्मण कानडे यांस श्री  साईराम अर्बन मल्टीस्टेटला कर्जापोटी दिलेला धनादेश न वटल्याने २ वर्ष शिक्षा व दंड

बीड (प्रतिनिधी): कर्जदार मुकेश लक्ष्मण कानडे रा. शिरूर (का )याने श्री साईराम अर्बन मल्टीस्टेट बीड यांचेकडून श्रद्धा किराणा या व्यवसायासाठी १०लक्ष रुपयांचे कर्ज घेतले होते. थकीत कर्जापोटी त्याने साईराम अर्बनला  १०,११,५५८/- दहा लाख अकरा हजार पाचशे अठ्ठावन्न रु चा धनादेश दिला होता. सदर धनादेश न वटल्याने साईराम अर्बनने  मा.प्र. वर्ग न्यायदंडाधिकारी साहेब बीड यांचे न्यायालयात प्रकरण दाखल केले होते. सदर प्रकरणात साक्षीपुरावा होऊन मा. न्यायालयाने आरोपी मुकेश कानडे यास १३८ निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अॅक्ट १८८१ कलम २५५(2)नुसार दोषी धरून दोन वर्षे  कैदेची शिक्षा ठोठावली.तसेच अनादरीत धनादेशापोटी फौ.प्र.सं.१९७३ कलम ३५७ (3) नुसार २०,२३,११६/-वीस लाख तेवीस हजार एकशे सोळा रु नुकसान भरपाई  श्री साईराम अर्बनला  देण्याचे आदेश दिले. श्री साईराम अर्बन मल्टीस्टेटतर्फे  फिर्यादी म्हणून श्री शरद सीताराम कुलकर्णी (वसुली अधिकारी ) तसेच अॅबड. भगवान रामराव ढाकणे यांनी कामकाज पहिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा