Subscribe Us

header ads

मिल्लीया महाविद्यालयाचे विद्यार्थी शेख अमन व शेख अमान यांचे प्रश्नमंजुषा स्पर्धेत यश

बीड स्पीड न्यूज 

मिल्लीया महाविद्यालयाचे विद्यार्थी शेख अमन व शेख अमान यांचे प्रश्नमंजुषा स्पर्धेत यश

बीड : महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई यांनी युवा वर्गात एचआयव्ही/ एड्स जनजागृती करण्याकरीता व रेड रिबन क्लब च्या कार्यक्रमांना प्रोत्साहन देण्याकरीता मिल्लीया कला, विज्ञान व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालय बीड येथे दिनांक 13 ऑक्टोंबर 2022 रोजी जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा (Quiz Competition) आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी 23 महाविद्यालयांना आमंत्रित केले होते, परंतु 12 महाविद्यालयातील रेड रिबन क्लब चे विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी प्रश्नमंजुषा स्पर्धेत भाग घेतला. ही स्पर्धा प्रथम फेरीत तोंडी प्रश्नमंजुषा व द्वितीय फेरीत लेखी स्वरूपात घेण्यात आली. प्रथम पारितोषिक बलभीम महाविद्यालय, बीडची कु. काझी आयशा व चि. पंडित चव्हाण यांना 3000/- रुपये, द्वितीय पारितोषिक स्वतंत्रवीर सावरकर महाविद्यालय, बीडची कु. वैष्णवी काळे व कु. धनवी पाटील यांना 2000/- रुपये व  तसेच तृतीय पारितोषिक मिल्लीया महाविद्यालयाचे विद्यार्थी शेख अमान जुबेरुद्दीन व शेख अमन युनूस यांना1000/- व प्रमाणपत्र देण्यात आले. सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री सुहास कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सय्यद हनीफ यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे रेड रिबन क्लब प्रमुख तथा राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ.शेख रफिक, श्री. सुहास कुलकर्णी (जिल्हा कार्यक्रमाधिकारी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष जिल्हा रुग्णालय बीड) श्री. एफ.आर. फारोकी(जिल्हा नियंत्रण व मूल्यमापक सहाय्यक जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष बीड), श्री. नवनाथ चव्हाण (जिल्हा सहाय्यक लेखा, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष), डॉक्टर अरुण राऊत (वैद्यकीय अधिकारी ए.आर.टी. सेंटर जिल्हा रुग्णालय बीड), श्री. जनार्दन माचपल्ले (समुपदेशक, पी पी टी सी टी विभाग), श्री. अमोल घोडके, श्री. एफ.आर. इनामदार, श्री. इंगळे एम. एस.(प्रयोगशाळा तंत्रज्ञ जिल्हा रुग्णालय बीड), सौ.सुवर्णमाला आदमोन (झोनल सुपरवायझर ग्रामीण विकास मंडळ,बीड) यांची उपस्थिती होती.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहम्मद इलयास फाजील, उपप्राचार्य डॉ. सय्यद हनीफ, उपप्राचार्य डॉ. हुसैनी एस. एस.,राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. शेख रफिक, प्रोफेसर मिर्झाअसद बेग, प्राध्यापिका डॉ. शेख एजाज परवीन यांनी अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा