Subscribe Us

header ads

नेकनूर मध्ये मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट अनेकांना चावा घेऊन केले जखमी मात्र नेकनूर ग्रामपंचायत झोपेत!

बीड स्पीड न्यूज 

नेकनूर मध्ये मोकाट कुत्र्यांचा  सुळसुळाट अनेकांना चावा घेऊन केले जखमी मात्र नेकनूर ग्रामपंचायत झोपेत!




नेकनूर | प्रतिनिधी -: नेकनूर येथे मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातला असल्याने नागरिकांमध्ये दहशताचे वातावरण निर्माण झाले आहे. गुरूवार रोजी १० ते १५ जणांना कुत्र्या चावल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. सदरील घटनेमुळे शाळकरी मुले व पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी ग्रामपंचायत कार्यालय नेकनूर मध्ये ग्राम विकास अधिकारी व सरपंच यांना मतीन खतीब, नवीद काजी, शेख मोईज व ऑड.शेख असलम यांनी निवेदना द्वारे मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. पण ग्रामपंचायत ने कोणतीच उपाययोजना केली नाही परिणामी नागरिकांना कुत्र्यांच्या त्रासाला बळी पडावं लागत आहे. शाळकरी मुला मुली लहान लेकरांन सोबतच शेळी वगार सारखे पालतू जनावरांवर देखील मोकाट कुत्र्यांचा हल्ला होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नेकनूर ग्रामपंचायत ने मोकाट कुत्र्यांची वेळीच बंदोबस्त करण्याची मागणी पुन्हा जोर धरत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा