Subscribe Us

header ads

बार्टीच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी सोडवण्यासाठी कटीबद्ध - महासंचालक धम्मज्योती गजभिये

बीड स्पीड न्यूज 


बार्टीच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी सोडवण्यासाठी कटीबद्ध - महासंचालक धम्मज्योती गजभिये

नालंदा फाउंडेशन बीडच्या वतीने धम्मज्योती गजभिये यांचा यथोचित सत्कार


बीड(प्रतिनिधी):-डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे च्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी सोडवण्यासाठी कटीबद्ध  असल्याचे मत बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी व्यक्त केले. ते तुलसी कॉलेज ऑफ आयटी अँड मॅनेजमेंट,बीड येथे दि.११ ऑक्टोंबर आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान बोलत होते. यावेळी नालंदा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा.प्रदीप रोडे, महावितरणचे निवृत्त अधीक्षक अभियंता रवींद्र कोलप, जात पडताळणी विभागाचे अधिकारी जगदाळे, बार्टीचे विकास गायकवाड यांची उपस्थिती होती.नालंदा फाउंडेशन बीडच्या वतीने बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था बार्टीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी सोडवण्यासाठी कटीबद्ध असून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी नवीन कोर्सेस उपलब्ध करून देणार असल्याचे गजभिये यांनी सांगितले.बार्टी मार्फत प्रशिक्षण कक्ष, प्रकाशन व प्रसिद्धी विभाग, कौशल विकास विभाग, उद्योजकता व्याख्यानमाला, यूपीएससी विभाग, एमपीएससी विभाग, पोलीस व मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण, बँक, रेल्वे, एलआयसी इत्यादी व तत्सम पदाच्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना, अधिछात्रवृत्ती, ऑनलाइन जात पडताळणी, माहिती तंत्रज्ञान कक्ष, समता दूत विभाग, मूल्यमापन कक्ष, येरवडा निवासी शाळा, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक महाड,.अनुसूचित जाती - अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा१९८९ व सुधारित अधिनियम २०१६ प्रशिक्षण कार्यशाळा विभाग आदी बार्टी संस्थेच्या माध्यमातून सुरू आहेत. सर्व जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात येणार आहेत. समाजजदूत विभाग मार्फत समाजात जातीय दुर्भावना असू नये जातीय दुर्भावना करणाऱ्याचा शोध घेऊन त्या कारणांचे निर्मूलन व्हावे यासाठी बार्टी संस्थे मार्फत महसूल विभाग निहाय समाजदूत हा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत असल्याचे बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी सांगितले आहे. यावेळी नालंदा फाउंडेशन बीडच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या सुसज्ज ग्रंथालयाची पाहणी धम्मज्योती गजभिये यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा