Subscribe Us

header ads

परळी शहरातील दलितांच्या स्मशान भूमी मध्ये लाईट व पाण्याची सोय करण्यात यावी-- प्रेम जगतकर.

बीड स्पीड न्यूज 

परळी शहरातील दलितांच्या स्मशान भूमी मध्ये लाईट व पाण्याची सोय करण्यात यावी-- प्रेम जगतकर.                

परळी | प्रतिनिधी-: परळी शहरातील दलितांच्या स्मशानभूमीमध्ये लाईट व पाण्याची सोय करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन युवा आघाडीचे परळी शहराध्यक्ष प्रेम जगतकर यांनी केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की परळी शहरातील दलितांसाठी एकच स्मशानभूमी असून या स्मशानभूमीत इसवी सन 2020 मध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार योजनेतून 50 लाख ते एक कोटी पर्यंत खर्च करण्यात आला आहे. परंतु या स्मशानभूमीचे अर्धवटच कामे राहिले आहेत जसे की लाईट व्यवस्था करणे, रंगरंगोटी करणे हे कामे अपुरे राहिले असून यामध्ये पाण्याची व्यवस्था केली असता येथील बोर व सर्व पाईप लाईन बंद पडली असून या स्मशानभूमीमध्ये एखाद्याचा शव घेऊन जातेवेळी रस्त्याच्या आजूबाजूला दोन्ही कडेला बाभळीचे काटेरी झाडे व इतर झाडे झुडपे ही खूप झाल्यामुळे शव नेण्यास अडथळा निर्माण होत आहे. तर संध्याकाळी एखाद्याचा अंत्यविधी करायचा म्हणलं तर येथे लाईटची व्यवस्था नाही व पाण्याची व्यवस्था नाही त्यासाठी या स्मशानभूमीतील वाढलेले काटेरी झाडे झुडपे साप सूप करून व तोडून तसेच विद्युत पुरवठा घेऊन लाईटची व्यवस्था करणे व पाण्याची व्यवस्था करणे तसेच सदरील बांधकामाला रंग रंगोटी करण्यात यावी अशा प्रकारे सदरील स्मशानभूमीतील वरील सर्व कामे लवकरात लवकर म्हणजे 31 ऑक्टोबर पर्यंत करण्यात यावेत अन्यथा एक नोव्हेंबर 2022 रोजी परळी नगरपालिकेच्या समोर वंचित बहुजन युवा आघाडी परळी शहराच्या वतीने उपोषण करण्यात येईल. असे लेखी निवेदन परळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना देण्यात आले असल्याची माहिती वंचित बहुजन युवा आघाडीचे परळी शहराध्यक्ष प्रेम जगतकर यांनी दिली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा