Subscribe Us

header ads

परळीच्या कु.श्रद्धा गायकवाडने पटकावले ३६ व्या नॅशनल गेम्स स्पर्धेत सुवर्ण पदक

बीड स्पीड न्यूज 


परळीच्या कु.श्रद्धा गायकवाडने पटकावले ३६ व्या नॅशनल गेम्स स्पर्धेत सुवर्ण पदक

फ्रांस मध्ये होणाऱ्या ऑलम्पिक मध्ये भारतीय संघात निवड


परळी वैजनाथ, प्रतिनिधी...परळी साठी अतिशय अभिमानाची बाब म्हणजे परळीची कन्या कुमारी श्रद्धा गायकवाड हिने 36 व्या नॅशनल गेम्स स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले असून फ्रान्समध्ये होणाऱ्या ऑलिंपिक साठी भारतीय संघात तिची निवड झाली आहे. या निवडीबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. ऑलम्पिक साठी निवड होणारी परळीतील ती पहिलीच खेळाडू ठरली आहे. परळी साठी ही अत्यंत गौरवाची बाब ठरली आहे. अहमदाबाद येथे नुकत्याच संपन्न झालेल्या ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत परळीच्या  कु.श्रध्दा रविंद्र गायकवाड हिने "स्केट बोर्डिंग" या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे.  तिची "स्केट बोर्डिंग" या क्रीडा प्रकारात फ्रांस मध्ये होणाऱ्या ऑलम्पिक मध्ये भारतीय संघात निवड झाली आहे. रविंद्र गायकवाड हे परळी येथील रहिवाशी असून ते सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतात त्यांच्या कन्येने या क्रीडा प्रकारात घेतलेली आंतरराष्ट्रीय पातळीवरील परळीच्या अभिमानाची ठरली आहे. कु.श्रद्धा गायकवाड य परळीच्या सुवर्णकन्येने परळीचे नाव संपूर्ण भारत देशात गाजविले आहे.परळीचे रविंद्र गायकवाड यांची ती कन्या असुन परळीतील जाहिरात उद्घघोषक  बालाजी गायकवाड यांची ती पुतणी आहे. श्रद्धाचे वडील रविंद्र गायकवाड हे पुण्यामध्ये एका खाजगी कंपनी मध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात.अतिशय बिकट परिस्थिती मधून श्रद्धाने ही कामगिरी पूर्ण केली आहे. तिच्या यशाने परळीच्या नावलौकिकात मोठी भर पडली असून परळीतून आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड होणारी ती पहिलीच खेळाडू ठरली आहे. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा