Subscribe Us

header ads

लोकनेता संपर्क कार्यालयात सेलु सेवा सहकारी सोसायटीची चेअरमनपदी दत्तात्रय गुट्टे तर व्हाईस चेअरमन पदी लक्ष्मण सातपुते यांच्या निवडीबद्दल सत्कार

बीड स्पीड न्यूज 


लोकनेता संपर्क कार्यालयात सेलु सेवा सहकारी सोसायटीची चेअरमनपदी दत्तात्रय गुट्टे तर व्हाईस चेअरमन पदी लक्ष्मण सातपुते यांच्या निवडीबद्दल सत्कार

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- सेलू सेवा सहकारी सोसायटीची चेअरमनपदी दत्तात्रय गुट्टे तर व्हाईस चेअरमनपदी लक्ष्मण सातपुते या दोघांची बिनविरोध निवड झाली आहे. त्याबद्दल लोकनेता संपर्क कार्यालयात भाजपचे नेते राजेश गित्ते याच्या वतीने सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शहरात लोकनेता संपर्क कार्यालयात येथे गुरुवार दि.06 ऑक्टोबर रोजी  भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे व खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या माध्यमातून जनसेवा शेतकरी विकास पॅनलने बाजी मारत 13 पैकी 11 उमेदवार निवडणूक आले होते. सेवा सहकारी सोसायटीची चेअरमन पदासाठी घेण्यात आलेली निवडणूक बिनविरोध झाली असून चेअरमनपदी दत्तात्रय नारायण गुट्टे तर व्हाईस चेअरमन पदी लक्ष्मण अंबादास सातपुते यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करून आणि पेढा भरवुन अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी भाजपा नेते राजेश गिते,मा पंचायत समिती सदस्य मारोतराव फड, मांडवा सरपंच सुंदर मुंडे, नंदनंज सरपंच अनिल गुट्टे,सेलु सरपंच गंगाधर सातपुते, राम मुंडे,जनार्धन मुंडे,राजेभाऊ भांगे, बाबुराव गुट्टे आदि उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा