Subscribe Us

header ads

परळीच्या कन्यने रचला इतिहास; कु. श्रद्धा गायकवाड हिची ऑलिम्पिक मध्ये निवड; प्रा.टी.पी. मुंडे यांनी केले अभिनंदन!

बीड स्पीड न्यूज 


परळीच्या कन्यने रचला इतिहास; कु. श्रद्धा गायकवाड हिची ऑलिम्पिक मध्ये निवड; प्रा.टी.पी. मुंडे यांनी केले अभिनंदन!

जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर श्रद्धाने परळीचे देशभरात नाव केले—प्रा.टी.पी.मुंडे

परळी वैजनाथ प्रतिनिधी-: आजचा दिवस हा परळी साठी अत्यंत भाग्याचा दिवस उजाडला परळीची कन्या कु. श्रद्धा रवींद्र गायकवाड हिने 36 व्या नॅशनल स्पोर्ट स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आणि ऑलम्पिक मध्ये स्थान मिळवले त्याबद्दल लोकनेते प्रा. टी.पी. मुंडे (सर) यांनी तिचे अभिनंदन केले आहे. अहमदाबाद येथे संपन्न झालेल्या 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तिने स्टेट बोर्डिंग या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक पटकावले आणि फ्रान्समध्ये होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेत भारतीय संघात तिची निवड झाली तिने कमावलेले यश जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तिने इतिहास रचून परळीचे नाव जगभरात पोहोचवले असे प्रतिक्रिया लोकनेते प्रा.टी.पी.मुंडे (सर) यांनी दिली आजचा दिवस स्वर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखा आहे तिने परळीचे नाव जगभरात पोहोचवल्याबद्दल तिचे त्यांनी कौतुक केले.परळीतील श्रद्धा गायकवाड ही पहिलीच ऑलम्पिक मध्ये जाणारी खेळाडू म्हणून तिने आपले नाव कोरले आहे. परळी साठी ही गोष्ट अभिमानास्पद आहे. विशेष म्हणजे तिचे वडील रवींद्र गायकवाड सेक्युरिटी गार्ड चे काम करून आपल्या मुलीचे स्वप्न त्यांनी पूर्ण केले तसेच तिचा काका आणि परळी शहरातील प्रसिद्ध अलाउन्सर बालासाहेब गायकवाड हा लोकनेते प्रा.टी.पी. मुंडे (सर) यांचा गेल्या पंचवीस वर्षापासूनचा कार्यकर्ता आहे श्रद्धा गायकवाड ही त्याची पुतणी  आहे. आपल्या कार्यकर्त्यांच्या पुतणीने मिळवलेले यश हे कौतुकास्पद असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा