Subscribe Us

header ads

मातृभाषेतून शिक्षण अधिक प्रभावी- अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर-पवार

बीड स्पीड न्यूज 

मातृभाषेतून शिक्षण अधिक प्रभावी- अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर-पवार 

मिलिंद विद्यालयात 'शारदोत्सव-२०२२' निमित्त सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

परळी वै, ता.५ (बातमीदार):शिक्षणासोबतच चांगले संस्कार लावण्याचे महत्वाचे कार्य मराठी माध्यमाच्या शाळा खूप चांगल्या प्रकारे करत आहेत व त्याच बरोबर पालकांनी आपल्या पाल्यांस त्यांच्या आवडीनुसार करीअर करण्यासाठी प्रोत्साहीत करावे असे मनोगत अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर-पवार मॅडम यांनी मिलिंद विद्यालयात 'शारदोत्सव-२०२२' निमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.परळी वैजनाथ येथील नाथ शिक्षण संस्था संचलित मिलिंद माध्यमिक व ज्युनियर कॉलेज येथे दिनांक ४ ऑक्टोबर रोजी 'शारदोत्सव-२०२२' च्या समारोप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला होता.विद्यार्थ्यांच्या उपजत कला गुणांना वाव मिळावा या उद्देशातून अंतरवर्गीय चित्रकला,हस्तकला, मातीकला,भाषण,अभिनय इत्यादी स्पर्धांचे अध्यापन कार्यात खंड न पडू देता मागील एक महिन्यापासून कलाशिक्षण व शारिरीक शिक्षणाच्या तासिकांमध्ये सोईनुसार घेण्यात या स्पर्धा घेण्यात आल्या. ‘शारदोत्सव-२०२२’ ची  सांगता मिलिंद माध्यमिक विद्यालयातील मैदानावर दि.४ ऑक्टोबर २२ रोजी सायंकाळी ६ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत सांस्कृतिक व रंगारंग कार्यक्रमाने झाली.या कार्यक्रमास अध्यक्ष स्थानी नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव  श्री.प्रदीप खाडे साहेब हे होते तर उद्घाटक तथा प्रमुख मार्गदर्शक म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई  श्रीमती कविता नेरकर-पवार मॅडम, प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध उद्योजक श्री.सुरेश नाना फड, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ.अरूण गुट्टे , संभाजीनगर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्री.सुरेश चाटे, नाथ शिक्षण संस्थेचे समन्वयक तथा यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.अतुल दुबे सर, शा.गु.मेनकुदळे शाळेचे मुख्याध्यापक श्री.साखरे सर, शारदा विद्यामंदिरचे मुख्याध्यापक श्री. अविनाश लोणीकर, मिलिंद माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री.रमेश कोम्मावार, उप-प्राचार्य श्री.इरफान शेख इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात  सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून   मान्यवरांच्या व विद्यार्थिनींच्या  हस्ते दीपप्रज्वलन करून झाली. या प्रसंगी चि.सोहम कुलकर्णी या विद्यार्थ्याने NEET परीक्षेत ५५३ गुण प्राप्त केल्या बद्दल व माजी विद्यार्थी चि.आशिष साबणे याने MD.Medicine या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवल्या बद्दल मान्यवरांच्या हस्ते पालकांसह यशास्वितांचा सत्कार करण्यात आला.अध्यक्षीय समारोपात नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव सन्माननीय श्री.प्रदीप खाडे यांनी संस्थेचे अध्यक्ष माननीय आमदार श्री.धनंजय मुंडे साहेबांच्या मार्गदर्शना खाली नाथ पॅटर्न राबवून शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून नाथ शिक्षण संस्थेचा नावलौकिक संपूर्ण महाराष्ट्रात परिचित होईल असे कार्य करण्याचे आश्वासन उपस्थित विद्यार्थ्यांस व पालकांस दिले. यानंतर विद्यार्थ्यांनी नवरात्री निमित्त शारदोत्सव २०२२ अंतर्गत दांडिया,गरबा विविध लोकनृत्यातून कलाविष्कार सादर करत उपस्थिताची मने जिंकली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री.कोम्मावार सर यांनी केले तर सुत्रसंचलन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री.नितीन व्हावळेसर व श्रीमती प्रतिक्षा बनसोडे मॅडम यांनी केले. आभार जेष्ठ शिक्षक श्री. कदरकर यांनी मानले. या कार्यक्रमास शाळेतील विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व शिक्षक प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी अथक परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा