Subscribe Us

header ads

किरण गित्ते यांना राष्ट्रपतीच्या हस्ते पुरस्कार मिळाल्याबद्दल शिक्षकांच्या वतीने सत्कार संपन्न

बीड स्पीड न्यूज 


किरण गित्ते यांना राष्ट्रपतीच्या हस्ते पुरस्कार मिळाल्याबद्दल शिक्षकांच्या वतीने सत्कार संपन्न

परळी,(प्रतिनिधी):- स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत संपुर्ण देशात छोट्या राज्यामध्ये त्रिपुरा ने पहिला क्रमांक पटकावला आहे. दिल्ली येथील आयोजीत समारंभात राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते त्रिपुराचे नगरविकास सचिव श्री किरण गित्ते यांना पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल परळी वै तालुक्यातील शिक्षकांच्या वतीने किरण गित्ते यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन आयएएस अ‍ॅकॅडमी प्रियानगर परळी येथे दि.6 ऑक्टोबर 2022 रोजी सत्कार करण्यात आला. यावेळी वैद्यनाथ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रदिप मेश्राम, सुरेशनाना फड, प्राचार्य अतुल दुबे, अजय जोशी, मिलींद महाविद्यालयाचे प्राचार्य कोम्मवार,  महादेव धायगुडे सर, संजय कराड, बंडु आघाव, मदन कराड, अंकुश फड,  निवेदक महेश मुंडे  ,पदमाकर आंधळे, जोगदंड सर, बोंडगे, सुनिल चव्हाण, प्रसाद सर, उबेद सर, संतोष खाडे, रवि कराड, देशमुख सर, विठ्ठल आघाव, भास्कर आंधळे ,महादेव फड ,प्रकाश चाटे ,परळी पंचायत समितीचे ओ.एस.दराडे, चाटे सर, विष्णू ढाकणे ,आदी शिक्षक व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा