Subscribe Us

header ads

मिल्लिया महाविद्यालयाचा स्वच्छ भारत अभियानात सहभाग

बीड स्पीड न्यूज l



मिल्लिया महाविद्यालयाचा स्वच्छ भारत अभियानात सहभाग

बीड: येथील मिल्लीया कला, विज्ञान व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे स्वच्छ भारत अभियान (Clean India Campaign) अंतर्गत दिनांक 06-10-2022 रोजी शहीशावली दर्गा व कंकालेश्वर मंदिर परिसर येथे स्वच्छता अभियान राबवण्यात आले.  राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी परिसर स्वच्छ केला तसेच प्लास्टिक बॅग, रिकाम्या पाणी बाटल्या जमा केल्या. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रोफेसर डॉ. मिर्झा असद बेग यांनी विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनामध्ये आपला परिसर तसेच महाविद्यालय स्वच्छ ठेवावा व समाजामध्ये स्वच्छतेसंबंधी जनजागृती निर्माण करावी असे सांगितले. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. शेख रफिक यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व सांगितले व स्वच्छतेची शपथ दिली. स्वच्छ भारत अभियानात राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी-विद्यार्थिनी, कार्यक्रमाधिकारी प्राध्यापिका डॉ. शेख एजाज परवीन, डॉ. रमेश वारे यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहम्मद इलयास फाजील  यांचे मार्गदर्शन लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक