Subscribe Us

header ads

जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याची बीड येथे विटंबना!

बीड स्पीड न्यूज 


जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याची बीड येथे विटंबना


पुतळा विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा : वीरशैव समाज व बस्वप्रेमी परळीच्या वतीने उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

परळी वैजनाथ /प्रतिनिधी-: बीड येथे जगद्ज्योती थोर समाज सुधारक महात्मा बसवेश्वर महाराजांच्या  पुतळ्याची अज्ञात समाजकंटकांनी विटंबना केली. या घटनेच्या निषेधार्थ आज मंगळवार दिनांक 1 नोव्हेंबर रोजी वीरशैव समाज व बस्वप्रेमी परळीच्या वतीने  उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे यांना निवेदन देण्यात आले. जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. उपजिल्हाधिकारी परळी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बीड शहरात सोमवार दि. ३१ ऑक्टोंबर २०२२ रोजी  महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याच्या परिसरातील ग्रील व कोनशिलेची अज्ञात समाजकंटकांनी तोडफोड करुन नासधूस केली आहे. यामुळे बीड जिल्ह्यातील वीरशैव समाजात संतापाची लाट निर्माण झाली आहे. यापुर्वीही येथे असे प्रकार घडलेले आहेत यामुळे समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रकार होत आहेत. थोर समाजसुधारक जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळा परिसरातील या प्रकारात आरोपी असलेल्या समाजकंटकांना त्वरित अटक करावी अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल या मागणीसाठी समस्त वीरशैव समाज परळी वैजनाथ तर्फे  निवेदन देण्यात आले आहे. बीड शहरात गेल्या महिनाभरात महात्मा बसवेश्वर महाराजांच्या  पुतळळ्याची विटंबना केल्याची ही दुसरी घटना आहे. या प्रकरणी परळी वीरशैव समाजाच्या व बस्वप्रेमी वतीने निषेध नोंदवत उपजिल्हाधिकारी परळी यांना आज मंगळवारी  निवेदन देण्यात आले. दरवेळी प्रशासनाकडून समाजकंटकांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले जाते. मात्र आता आश्वासन नको, समाजकंटकांवर कडक कारवाईच करा असा आक्रमक पावित्रा वीरशैव समाज व बस्वप्रेमी बांधवांनी घेतला आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे की महापुरुषांचा वारंवार अवमान करणार्‍यांना जेरबंद करा, यापुढे अशा घटना घडू नयेत म्हणून महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याजवळ सुरक्षा रक्षकाची नेमणूक करावी, पुतळ्याच्या चबुतर्‍याच्या फरशी व लोखंडची तोडफ ोड झाल्याने पुतळ्याचे पुन्हा नव्याने सुशोभिकरण करावे अशी मागणी परळी वीरशैव समाज व बस्वप्रेमी बांधवांनी केली आहे.  आश्वासन नको, समाजकंटकांवर थेट कारवाई करुन त्यांचा कायमचा बंदोबस्त करावा असा आक्रमक पावित्रा परळी वीरशैव समाज व बस्वप्रेमी बांधवांनी घेतला आहे. यावेळी समाज बांधव व बस्वप्रेमी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा