Subscribe Us

header ads

पत्रकार महादेव गिते यांच्या कार्याचे फलित म्हणजे सावित्रीज्योती पुरस्कार- उत्तम माने

बीड स्पीड न्यूज 

पत्रकार महादेव गिते यांच्या कार्याचे फलित म्हणजे सावित्रीज्योती पुरस्कार- उत्तम माने

परळी  वैजनाथ (प्रतिनिधी) :- गत 12 वर्षापासुन पत्रकार महादेव गित्ते यांचे पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रास सुरु असलेल्या अविरत कार्याचे फलित म्हणजे निर्वाण फाउंडेशनच्या वतिने दिला जाणारा सावित्रीज्योती हा राज्यास्तरीय पुरस्कार असल्याचे प्रतिपादन जेष्ठ नेते उत्तम माने यांनी व्यक्त केले. सायं. दैनिक अभिमानचे तालुका प्रतिनिधी महादेव गित्ते यांना निर्वाण फाउंडेशनचा सावित्रीज्योती पुरस्कार मिळाल्याबद्दल परळी येथे त्यांचा सत्कार करण्यात आला.महादेव गित्ते यांनी पत्रकारीता क्षेत्रात विविध प्रश्नांना सोडवण्यासाठी बातमीच्या माध्यमातून आवाज उठवला आहे. तसेच गेल्या तीन टर्म परळी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष पद संभाळले आहे. गेल्या 12 वर्षे पासून पत्रकारिता क्षेत्रात काम करीत आहे. बातमीच्या माध्यमातून सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, राजकीय, व इतर सर्व प्रश्न सोडवण्यासाठी पत्रकारितेच्या प्रामाणिकपणे काम करत नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहे.  कोविड मध्ये देशासाठी,समाजासाठी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता नागरीकांच्या सुरक्षेततेसाठी अहोराञ काम केले आहे. सामाजीक कार्यातुन आणी पञकारीतेच्या माध्यमातुन समाजहितासाठी व कोरोणाच्या पार्श्वभुमीवर जनजागृती,  कोरोनाच्या टाळेबंदी काळात जनतेच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली आहे. गेल्या कित्येक वर्षापासून प्रचंड मेहनत आणि कष्ट घेऊन तसेच उच्च पदवी संपादन करून पत्रकारितेमध्ये आपले वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण केलेले आहे.लेखणी सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि वैचारिक मनोभूमिका बनवण्यात मोलाची ठरत असे. त्यांच्या लेखनाचे कौतुक बड्या राजकीय पुढाऱ्यांनी सुद्धा केलेले आहे.  तसेच कोरोना व्हायरस च्या पार्श्वभूमीवर अनेक योध्यानी आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावले आहे आणि याच पार्श्वभूमीवर पत्रकार म्हणून  कोरोना योद्धा म्हणून पत्रकारिता क्षेत्रात उत्तम कामगिरी बद्ददल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पञकारीता क्षेञात ईलेक्ट्रॉनिक मिडिया व प्रिंट मिडियातील त्यांचा अनुभव हा मोठा आहे.त्यांच्या या कार्याची दखल घेत निर्वाण फाउंडेशनच्या वतीने यावर्षीचा सन 2022 साठीचा दिला जाणार्या राज्यस्तरीय "सावित्रीज्योती" पुरस्कारासाठी निवड झाली.याबद्दल परळी येथे मित्र परिवाराच्या वतिने दि.1 नोव्हेंबर रोजी सत्कार करण्यात आला. यावेळी उत्तम माने, माऊली आघाव, जितेंद्र मस्के, हरिष नागरगोजे, गंगाधर जगतकर, पत्रकार धनंजय आढाव, गोविंद चांडक, यशवंत चव्हाण, संतोष घुमरे, नानासाहेब जाधव व आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा