Subscribe Us

header ads

विकासकामांना निधी आणण्यासाठी निरंतर प्रयत्नशील - आ. संदिप क्षीरसागर

बीड स्पीड न्यूज 


विकासकामांना निधी आणण्यासाठी निरंतर प्रयत्नशील - आ. संदिप क्षीरसागर

स्वतः उभे राहून बार्शी रोडचे काम सुरू केले

बीड दि.२ (प्रतिनिधी):- शहरातील राष्ट्रवादी भवन ते सोमेश्वर मंदिर पर्यंतच्या ८०० मीटरच्या रस्त्याचे काम दोन दिवसांपूर्वी आ.संदीप क्षीरसागर यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आले होते. त्यानंतर बुधवार (दि.२) रोजी या रस्त्यावरील पडलेले खड्डे आधी बुजवून त्यावर हॉटमिक्स लेअर टाकण्यास प्रत्यक्ष सुरूवात करण्यात आली. यावेळी आ. संदिप क्षीरसागर यांनी, येत्या दोन दिवसात हे काम पूर्ण होवून नागरिकांना रहदारीसाठी रस्ता पुर्ववत 

सुरू होणार असल्याचे सांगून रखडलेले रस्त्यांचे कामांसह अन्य विकासकामांना जास्तीत जास्त निधी मिळवून शहरात विकासाची गंगा वाहती ठेवणार असल्याचे म्हटले.शहरातील बार्शी रोडवरच्या ८०० मीटर रुंदीच्या कामाची आज प्रत्यक्षात सुरूवात झाली.राष्ट्रवादी भवन ते सोमेश्वर मंदिर या भागात मोठ्या प्रमाणावर रस्त्या खड्डे पडलेले होते. दोन दिवसापूर्वी हे सर्व खड्डे अगोदर बुजवण्यात आले. त्यानंतर आज प्रत्यक्षात हॉटमिक्स 

लेअर टाकण्यात येत असून हे काम येत्या दोन दिवसात पूर्ण होणार असल्याचे आ. संदिप क्षीरसागर यांनी सांगितले. सदरचे काम लवकरात लवकर आणि दर्जेदार पध्दतीने करून घेण्यासाठी आ. क्षीरसागर थेट रस्ता कामाच्याठिकाणी आज सकाळी भेट देण्यासाठी गेले. प्रत्यक्ष उभा राहून त्यांनी हे काम सुरू ठेवले. पुढील काही दिवसांत रखडलेले रस्त्याचे अन्य कामे पूर्ण होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. शासनदरबारी अनेक रस्त्यांच्या कामाला सरकारने स्थगिती दिली आहे. मात्र रस्त्याच्या आणि विविध विकास कामांना लवकरच निधी मिळवून मंजूरी मिळावी यासाठी आपले प्रयत्न निरंतर सुरू असून बीड शहरासह ग्रामीण भागाचा जास्तीत विकास करणेच आपले ध्येय असल्याचे आ.संदीप क्षीरसागर यांनी म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा