Subscribe Us

header ads

वार्ड क्र.11 मधील रस्त्याच्या दयनीय अवस्थेला जबाबदार कोण?

वार्ड क्र.11 मधील रस्त्याच्या  अवस्थेला जबाबदार कोण? 
 
निवडणूकीच्या वेळी मतासाठी पुढे येणाऱ्यांनी रस्ता बनविण्यासाठी पुढे यावे-सय्यद शहेराज(मोनू)

बीड:- अमराई,बालेपीर येेेथील वार्ड क्रमांक 11 मध्ये रस्त्यावर जागोजागी खड्याचे साम्राज्य पसरले आहे,या रस्त्यावर माणूस चालूही शकत नाही. सदरील रस्ता बनविण्यासाठी निधी मंजूर झाल्याचे काही दिवसांपूर्वी सांगितले गेले परंतु अद्याप रस्ता बनविण्यास सुरवात झालेली नाही,रस्त्याच्या या दयनीय अवस्थेला नेमकं जबाबदार कोण?नगराध्यक्ष,आमदार की नगरसेवक असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते सय्यद शहेराज उर्फ मोनू यांनी उपस्तीत केला आहे.
काही दिवसांपूर्वी नगरअध्यक्ष साहेब वार्डात येऊन गेले,रस्त्याचे काम लवकरच सुरू होणार असे त्यांनी सांगितले, त्यानंतर नगरसेवक साहेबांनी सदरील रस्ता आम्हीच करणार आहोत,8-10 दिवसात रस्त्याकामाला सुरुवात होईल असे सांगितले,काही महिने उलटून गेले अद्याप काही रस्त्याचे काम सुरू झालेले नाही.यामुळेच वार्डातील नागरिक परेशान होऊन आधी रस्ता करा त्यानंतर तुमचे राजकारण करा असे बोलून दाखवीत आहे. या रस्त्यावरून गाडी चालवायची म्हणल्यावर लोकांच्या पाठीच्या मणक्याचे आजार वाढत आहे,कित्येक नागरिकांचा पाय या रस्त्यावरच्या खड्यात अडकून फॅक्चर झालेला आहे, परंतु कोणीही रस्ता बनविण्यासाठी सध्यातरी पुढाकार घेताना दिसत नाही.निवडणूक आली की मतासाठी पुढाकार घेणारे नेते रस्ता बनविण्यासाठी का पुढाकार घेत नाही,रस्ता बनविण्याची मागणी येथील नागरिक  कित्येक वर्षांपासून करीत आहे.रस्ता बनविण्याच्या मागणी कडे सतत दुर्लक्ष केले जात आहे.बीडमधील इतर ठिकाणचे रस्त्याची कामे सुरू आहेत परंतु अमराई भागातील रस्त्याचे काम राजकारणात अडकले असल्याचे सय्यद शहेराज यांनी निवेदनात म्हंटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा