Subscribe Us

header ads

2021-22 या वर्षात ड्रॅगन फ्रुट या फळपिकांसाठी महाडीबीटी या पोर्टलवर अर्ज करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

बीड,दि.14 (जि.मा.का.):- ड्रॅगन फ्रुट (कमलम) हे एक निवडुंग परिवारातील अत्यंत महत्त्वपूर्ण फळ आहे. या फळांमध्ये अधिक प्रमाणात उपलब्ध असणारे पोषक तत्व आणि अँटिऑक्सिडंट मुळे या फळास सुपर फ्रुट म्हणून प्रसिध्दी मिळत आहे. तसेच या फळात विविध औषधी गुण आहेत. या व्यतिरिक्त या फळांमध्ये पाच फॉस्परस व कॅल्शियम यासारखे मिनरल्स अधिक प्रमाणात आढळतात.पाण्याची टंचाई निर्माण झाली तरी ही झाडे कायम टिकून राहतात. तसेच या पिकावर रोग व किडींचा प्रादुर्भाव नगण्य असून पीक संरक्षणावर जास्त करता येत नाही.भारतीय बाजारपेठेमध्ये या फळांची मागणी व पिकाचे क्षेत्र वाढत आहे.या फळांचे क्षेत्र मागणी निर्यातक्षम, औषधे व पोषक मुल्य इत्यादी बाबी लक्षात घेऊन सन 2021-22 या वर्षापासुन एकात्मिक फलोत्पादन विकास अभियातुन ड्रॅगन फ्रुट लागवडीसाठी प्रोत्साहन देण्याचे धोरण निश्चित करण्यात आलेले आहे.


             ड्रॅगन फ्रुट लागवड करण्यासाठी जमिनीची पुर्वमशागत झाल्यावर दोन झाडांमध्ये 3 मीटर बाय 3 मीटर बाय 2.5 मीटर या अंतरावर खड्डे खोदुन खड्ड्याच्या मधोमध सिमेंट कॉंक्रिट किमान 6 फूट उंचीचा खांब व त्यावर काँक्रिटचे फ्रेम बसविण्यात यावी. सदर सिमेंट काँक्रेट खांबाच्या एका बाजुला एक याप्रमाणे चार बाजूला चार रुपये लावावीत.

            वरील प्रमाणे ड्रॅगन फ्रुट फळ पिकाची लागवड करण्यासाठी लागवड साहित्य,आधार पद्धत,ठिबक सिंचन,खते व पीक संरक्षण या भावी करता अनुदान देय आहे. याकरीता रक्कम रुपये चार लाख प्रकल्पमुल्य ग्राहय धरुन 40 टक्के प्रमाणे रक्कम रुपये 1.60 लाख अनुदान तीन वर्षात 60:20:20 या प्रमाणात देय आहे. दुसऱ्या वर्षी 75 टक्के व तिसऱ्या वर्षी  90 टक्के झाडे जिवंत असणे अनिवार्य आहे.            

तरी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की, ड्रॅगन फ्रुट लागवडीसाठी अधिकाधिक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल mahadbtmahait.gov.in वर फलोत्पादन या घटकासाठी अर्ज करावेत.अधिक माहितीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालय संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डी.जी.मुळे यांनी केले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा