Subscribe Us

header ads

आष्टी पीएसआयला 80 हजाराची लाच घेताना पकडले



आष्टी प्रतिनिधी-:  एका गुन्ह्यातील आरोपीचा  अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाकडून रद्द ना करण्यासाठी एक लाखांची लाचेची मागणी 80 हजारात तडजोड तयार झालेला अंभोरा(ता आष्टी ) पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला असून त्याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 
 राहुल पांडुरंग लोखंडे असे त्या पोलिस उपनिरीक्षकचे नाव आहे.  सध्या त्याची  नेमणूक अंभोरा पोलीस ठाण्यात आहे.  याच ठाण्यात दाखल  असलेल्या एका गुन्ह्यातील आरोपीचा मंजूर असलेला अटक पूर्व जामीन उच्च न्यायालयाकडून रद्द न करण्यासाठी व    गुन्ह्यात असलेल्या गाड्या जप्त ना करण्यासाठी पांडुरंग लोखंडे यांनी एक लाख रुपयांची मागणी केली होती.  याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर एसीबीच्या औरंगाबाद येथील पथकाने पडताळणी केली असता त्यात तडजोडी अंती पांडुरंग लोखंडे यांनी 80 हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले असल्याचे सिद्ध झाले.  त्याआधारे राहुल लोखंडे वर गुन्हा नोंद करण्यात आला आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा