Subscribe Us

header ads

नर्सची प्रेम प्रकरणातून आत्महत्या


 बीड प्रतिनिधी-:  तालुक्यातील पाली परिसरामध्ये ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत एका तरुणीचा मुतदहे  सोमवारी दि (26) रोजी आढळून आला होता.  सदरील तरुणीने प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.  याप्रकरणी नातेवाईकांच्या फिर्यादीवरून नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  सोनाली अंकुश जाधव (वय 26 रा.शिवाजी नगर.बीड) असे मयत तरुणीचे नाव आहे.  ती शहरातील दीप हॉस्पिटल मध्ये नर्स म्हणून कार्यरत होती.  इथे एक खाजगी लॅबमधील अक्षय राजाभाऊ आव्हाड (वय 27 रा.डोईफोडवाडी) याच्याशी प्रेमसंबंध होते.  सोनाली अक्षय कडे लग्नासाठी हट्ट धरला होता. मात्र अक्षयने लग्नाला नकार दिल्याने या  नैराश्यातून सोनालीने  गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.  याप्रकरणी सोनालीचा भाऊ अजय जाधव याने दिलेल्या फिर्यादीवरून नेकनूर पोलीस ठाण्यात अक्षय विरुद्ध कलम 306 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्‍मण केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार किशोर काळे करत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा