Subscribe Us

header ads

1 ऑगस्ट रोजी बीड जिल्ह्यात राष्ट्रीय लोकन्यायालय

 

बीड,दि.27 (जि.मा.का.):-बीड जिल्हयातील जिल्हा व तालुका न्यायालयाच्या सर्व ठिकाणी दि. 1 ऑगस्ट 2021 रविवार रोजी सकाळी 10.00 वाजता राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले असल्याचे जिल्हा विधी सेवा प्रधिकरणाचे अधिक्षक यांनी कळविले आहे.

         पक्षकारांनी त्यांची न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे तडजोडीने मिटवण्यासाठी येणाऱ्या राष्ट्रीय लोकन्यायालयात ठेवावीत. राष्ट्रीय लोकन्यायालयात दाखल पूर्व प्रकरणे, धनादेश अनादराची प्रकरणे, दिवाणी दावे, बॅकाची कर्ज प्रकरणे, कौटुंबिक कलहाची प्रकरणे, भुसंपादनाची प्रकरणे, दुरध्वनी देयकाची प्रकरणे, नगरपालिका, ग्रामपंचायत, विद्युत महामंडळ, राज्य परिवहन महामंडळ इत्यादी तडजोडीजन्य प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत. या  प्रकरणात तडजोड झाल्यास शंभर टक्के न्यायालयीन शुल्क परत मिळते.

            1 ऑगस्ट 2021 रविवार रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोकन्यायालयामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घेऊन लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष हेमंत श. महाजन, जिल्हा सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव सिध्दार्थ ना.गोडबोले, जिल्हा वकिल संघाचे अध्यक्ष ॲड एस.के. राऊत यांनी केले आहे.

                                                   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा