Subscribe Us

header ads

राज कुंद्राला २७ जुलैपर्यंत पोलिस कोठडी अश्लील चित्रपट प्रकरण

मुंबई-: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि बिझनेस मॅन राज कुंद्राला अश्लील चित्रपटांच्या निर्मितीप्रकरणामध्ये १९ जुलै रोजी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली.
आज म्हणजे शुक्रवारी २३ जुलै रोजी राजला दुपारी एकच्या सुमारास भायखळा कारागृहातून मे. न्यायालयात नेण्यात आले होते.
त्याला आज जामीण मिळणार होती.
मात्र, मुंबई गुन्हे शाखेने राज कुंद्राला ७ दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याची मागणी मे.न्यायालयात केली.
राज कुंद्राची चौकशी करण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेने त्यांनी ७ दिवस मागितले आहेत.
एवढंच नाही तर राज चौकशीत सहकार्य करत नसल्याचा आरोप मुंबई गुन्हे शाखेने केला आहे.
राज पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नाची उत्तर देत नाही.
या व्यतिरिक्त राज कुंद्रा पॉर्न चित्रपटाच्या व्यवसायाबद्दलचे अनेक प्रश्न टाळत आहे.
सोबत मनी ट्रेलच्या संबंधीत प्रश्नांना देखील तो टाळत आहे.
यामुळे मुंबई पोलिसांनी राज कुंद्राला ७ दिवस पोलिस कोठडीची ठेवण्याची याचिका दाखल केली.
यानंतर मे.न्यायालयाने राज कुंद्रा आणि रायन थोरपे यांना २७ जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

*काय आहे प्रकरण*?

फेब्रुवारी महिन्यात मुंबई पोलिसांच्या एका पथकाने मढ येथील ग्रीन पार्क बंगलोवर धाड टाकली होती.
याठिकाणी पॉर्नोग्राफिक शुटिंग होत असल्याच्या माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली होती.
त्यावेळी पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती.
तर एका मुलीची सुटका केली होती.
अटक करण्यात आलेल्या पाच जणांमध्ये दोन अभिनेत्यांचा,
तर दोन तरुणींचा समावेश आहे.
या दोन्ही तरुणी अभिनयाच्या क्षेत्रात नशिब आजमवण्यासाठी आल्या होत्या.
मात्र, त्या पॉर्नोग्राफिक व्हि.डी.ओ. तयार करणाऱ्या प्रोडक्शन हाऊसच्या जाळ्यात अडकल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा