Subscribe Us

header ads

माजलगाव सुर्डी अत्याचार प्रकरणात सहाय्यक पोलीस निरीक्षक निता गायकवाड निलंबित

बीड-: माजलगाव तालुक्यातील सुर्डी येथील नऊ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी माजलगावच्या महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक नीता गायकवाड यांना पोलीस अधीक्षक यांनी तडकाफडकी निलंबित केले आहे.
माजलगाव तालुक्यातील सुर्डी येथील एका नऊ वर्षाच्या मुलीवर अत्याचार‌ झाल्याची घटना घडली होती. दरम्यान तपासी अधिकारी निता गायकवाड यांनी न्यायालयात आरोपीच्या पोलीस कोठडीची मागणी केली नव्हती, त्यामुळे न्यायालयाने आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. त्यानंतर या प्रकरणातील तपासी अधिकारी महिला सपोनि. नीता गायकवाड यांना निलंबित करावे अशी मागणी सर्व स्तरातून करण्यात येत होती. यासंदर्भात अनेक शिष्टमंडळांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले होते. अखेर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार यांनी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी सपोनि. नीता गायकवाड यांच्यावर शनिवारी निलंबनाची कारवाई केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा