Subscribe Us

header ads

ए.टी.एम.(A.T.M.) फोडून १५ लाख पळवणारे जेरबंद चपलीवरून लावला आरोपींचा शोध!


पिंपरी-: चिंचवडमध्ये ए.टी.एम.(A.T.M.) फोडून १५ लाखांची रक्कम घेऊन पोबारा करणाऱ्या गुन्हेगारांना गजाआड करण्यात भोसरी पोलिसांना यश आले आहे. 
कौतुकास्पद म्हणजे पोलिसांनी आरोपीच्या चपलीवरून गुन्हा उघड करून गुन्हेगारांपर्यंत पोहचत त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. 
पोलिसांच्या या कामगिरीने अक्षरशा सुतावरून स्वर्ग गाठणे म्हणजे काय असतं ?, 
याचाच प्रत्यय आला आहे. 
या प्रकरणी मुख्य आरोपीसह चार जणांना अटक करण्यात आली आहे. 
या ए.टी.एम. फोडीच्या घटनेत बँक कॅशिअरसह इतर एका कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचं तपासात पुढे आलं आहे. 
रोहित काटे हा मुख्य आरोपी असून तो सेवा विकास को-ऑपरेटिव्ह बँकेत कॅशिअर आहे. 
त्याच्यासह रोहित गुंजाळ आणि आनंद मोरे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत.
 तर सचिन सुर्वे याला देखील गुन्हे शाखा युनिट दोनने ताब्यात घेतलं आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
 रोहित काटे हा सेवा विकास को-ऑपरेटिव्ह बँकेत कॅशिअर म्हणून एक वर्षांपासून काम करतो. 
तर, रोहित गुंजाळ हा देखील त्याच बँकेत काम करतो. 
दोघांनी संगनमत करून
 पुणे – नाशिक रोड लगत असलेल्या बँकेच्या शेजारील ए.टी.एम. फोडण्याचा प्लॅन केला. 
त्यानुसार, 
यात रोहित गुंजाळचा नातेवाईक आनंद मोरे आणि सचिन सुर्वे यांना देखील सहभागी करण्यात आलं. 
मुख्य आरोपी रोहित काटे आणि रोहित गुंजाळ यांनी ए.टी.एम.च्या लॉकरची बनावट चावी बनवून ती आनंदला दिली शिवाय पासवर्ड ही सांगितला. 
 पहाटेच्या सुमारास आनंद आणि सचिन सुर्वे यांनी एटीएममध्ये जाऊन पासवर्ड आणि बनावट चावीचा सहायाने लॉकर उघडून त्यामधून १५ लाखांची रोकड लंपास केली. 
चोरी दरम्यान, ए.टी.एम. मधील सी.सी.टी.व्ही. फोडण्यात आला.
 मात्र, एक मिनिटाच फुटेज रेकॉर्ड झालं होतं.
 पैसे घेऊन दोघेही फरार झाले होते. 
 सकाळी घटना उघडकीस आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा