Subscribe Us

header ads

नवगण राजुरी-सोनगाव रस्त्यासाठी सव्वा सात कोटी रूपयांचा निधी- आ.संदिप भैय्यांच्या प्रयत्नांना यश

बीड (प्रतिनिधी):- गेल्या अनेक वर्षापासून रखडलेला नवगण राजुरी-सोनगाव रस्त्याचा प्रश्न आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी मार्गी लावला आहे. या रस्त्याला प्रधानमंत्री ग्रामडसक योजने अंतर्गत सात कोटी 25 लक्ष रूपयांचा निधी मिळाला आहे. सदर रस्त्याचा प्रश्न मार्गी लागल्याने राजुरी नवगण व सोनगाव परिसरातील ग्रामस्थांचा प्रवास सुखर होणार आहे.
बीड मतदार संघात आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून सामाजिक न्यय व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात विकास कामे मार्गी लावण्यासाठी निधी येत आहे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत पहिल्या टप्प्यात टीओ2-एनएच361 एफ ते एसएच-59 नवगण राजुरी ते सोनगाव या 9 कि.मी. रस्त्याच्या कामासाठी 7 कोटी 25 लक्ष रूपयाचा निधी आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून मिळाला आहे. अनेक ग्रामीण भागातील रस्ते पंतप्रधान ग्राम सडक योजने अंतर्गत प्रस्तावित असून त्याला देखिल लवकरच मंजुरी मिळणार असल्याने बीड मतदार संघातील ग्रामीण भागातील रस्त्यांचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागणार असल्याचे दिसते.
चौकट
वाडी,वस्ती,तांड्यावर रस्ते जोडण्यासाठी
आ.संदिप भैय्या क्षीरसागरांचा भर
बीड मतदार संघात आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी येत आहे. ग्रामीण भागातील वाडी,वस्ती, तांड्यावर पक्के रस्ते आणि दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे. यावर आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांचा भर असल्याचे दिसून येत आहे. मोठ्या प्रमाणात बीड मतदार संघासाठी निधी येत असून या निधीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील रस्ते मजबुत होणार असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा