Subscribe Us

header ads

मादळमोहीत तरुणावर गोळीबार आरोपी सीसीटीव्हीत कैद दोन जणा विरुद्ध गुन्हा दाखल

 मादळमोही-:  मादळमोही येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणावर गोळीबार करण्यात आला मात्र सदरील तरूणाने गोळी  चुकविले याने तरुण वाचला ही घटना शुक्रवारी दुपारी दोन ते अडीच च्या सुमारास घडली असून हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध गेवराई  पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की गेवराई तालुक्यातील मादळमोही येथील पवन गावडे या तरुणाचे महामार्गा लगत घर व तेथेच बांधकाम साहित्याचे दुकान आहे.  दरम्यान शुक्रवारी दुपारी दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास दुकाना समोर पवन गवडे थांबले असता या ठिकाणी दोन तरुण मोटर सायकल वरून आले.  यानंतर जुन्या भांडणातून दाखल असलेला गुन्हा परत घे अशी कुरापत काढून पवन गावडे यांचीशी हुज्जत घातली त्याचे डोक्याला एकाने पिस्तूल लावून गोळी झाडली.  मात्र यावेळी पवन गावडे यांनी सतर्कता  दाखविल्याने गोळी डोक्यावरून गेली.  हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला.  याप्रकरणी यांच्या फिर्यादीवरून संजय पवार व  अविनाश पवार मी या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा