Subscribe Us

header ads

ना. धनंजय मुंडेंचा संकल्प सत्यात; पालावरच्या हजारो मुलांना मिळतेय मोफत शिक्षण!

*ना शाळा ना भिंती, सामाजिक न्याय विभागाचे शिक्षक देताहेत पालावर जाऊन ज्ञानाचे धडे...*

बीड (दि. 17) ---- : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून बीड जिल्हा सामाजिक न्याय विभागाने पालावर राहणाऱ्या, वीट भट्टीवर काम करणाऱ्या, भिक्षा मागणाऱ्या अशा पालकांच्या मुलांसाठी 'मिशन डायरेक्ट ऍडमिशन ही संकल्पना राबवून, यांतर्गत हजारो मुलांना समाज कल्याण विभागाच्या आश्रम शाळांमध्ये मोफत प्रवेश दिले आहेत. सध्या ऑनलाईन शिक्षणाची या मुलांकडे सोय होऊ शकत नसल्याने सामाजिक न्याय विभागाच्या शाळेतील शिक्षक थेट या पालांवर जाऊन या बालकांना शालेय शिक्षण देत आहेत.

मिशन डायरेक्ट ऍडमिशन अभियानातून सुमारे 5300 मुलांना ऍडमिशन देण्यात आले असून यांपैकी 3000 मुलांना पाल-वस्त्यांवर जाऊन शिक्षण देणे सुरू झाले असून उर्वरित विद्यार्थ्यांपर्यंत पोहचून त्यांनाही शिक्षण प्रवाहात सामील करण्यात येत असल्याचे सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांनी सांगितले.

पाल, वीट भट्टी, आदी ठिकाणी जाऊन कोणत्याही भिंती, शाळा हे बंधन तोडून ही मुले जागा मिळेल तिथे, अगदी मंदिरात, खुल्या मैदानात ज्ञानार्जन करत आहेत. धनंजय मुंडे यांनी या उपक्रमात सहभागी झालेल्या सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांच्यासह सर्व शिक्षकांचे कौतुक करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

मागील महिन्यात समाज कल्याण विभागाने मिशन डायरेक्ट ऍडमिशन राबवून समाज कल्याण विभागाच्या आश्रम शाळांमध्ये हजारो मुलांचे पाल-वस्त्यांवर जाऊन ऍडमिशन केले, परंतु सध्या शाळा बंद आहेत. तर दुसरीकडे या मुलांसाठी ऑनलाईन शिक्षणाची सोय करणेही जिकिरीचे आहे. याचाच विचार करून मंत्री महोदयांच्या संकल्पनेचा विस्तार करत आश्रम शाळेतील शिक्षक या पाल-वस्त्यांवर जाऊन बालकांना शिक्षण देत आहेत. पुढे विभागाच्या आश्रम शाळा सुरू होईपर्यंत हा उपक्रम सुरू राहणार आहे. तसेच जिल्ह्यात आणखी अशी मुले कुठेही शिक्षणापासून वंचित असतील तर बीड जिल्हा सामाजिक न्याय भवन येथे संपर्क करून माहिती द्यावी, त्यांच्यापर्यंत पोचण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू, अशी माहिती सा.न्या.चे सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा