Subscribe Us

header ads

राज्यावरील पुराचे संकट, कोरोना पार्श्वभूमीवरमुख्यमंत्री वाढदिवस साजरा करणार नाहीत


मुंबई दि 25: कोकणपश्चिम महाराष्ट्रावर निसर्ग कोपला असून पूरामुळे मृत्यू झाले आहेतअनेकांच्या कुटुंबीयांवर आघात झाला आहे. या आपत्तीत महाराष्ट्र शोकाकुल असून कुणीही माझा वाढदिवस साजरा करू नये असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.       

            27 जुलै रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस असला, तरी या आपत्तींमुळे वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. वाढदिवसानिमित्त कुणीही अभिष्टचिंतन करण्यासाठी प्रत्यक्ष भेटू नये तसेच फलकपोस्टर्स लावू नयेसोशल मीडिया आणि ईमेलच्या माध्यमातून आपण शुभेच्छा स्वीकारू असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

            राज्यात अद्याप कोरोनाचे संकट कायम आहे,संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता वैद्यकीय तज्ञांनी व्यक्त केली आहेत्यामुळे आरोग्याचे नियम कटाक्षाने पाळत राहणे गरजेचे आहेत्यामुळे वाढदिवसाचे कुठलेही जाहीर कार्यक्रम करू नयेत अशी विनंतीही मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

            पूर आणि कोरोना परिस्थितीत एकमेकांना मदत करणे गरजेचे आहेत्यामुळे वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये आपले योगदान देऊन सामाजिक जबाबदारीचे कर्तव्य पार पाडावे असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक