Subscribe Us

header ads

आ.संदिप भैय्या क्षीरसागरांनी निवडणुकीत दिलेला शब्द पाळला खांडेपारगाव,अंथरवणपिंप्री येथील 3 कोटी 27 लक्ष रस्ता कामाचे भूमिपुजन वाडी, वस्ती, तांड्यावर मुलभूत सुविधा देण्यासाठी प्रयत्नशिल-आ.संदिप क्षीरसागर

बीड (प्रतिनिधी):- निवडणुकीच्या काळात आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी दिलेल्या शब्दाची विकास कामांच्या रूपाने पुर्तता होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या अनेक वर्षापासून मुख्य रस्ता ते अंथरवणप्रिपी, मुख्य रस्ता ते खांडेपारगाव येथील रस्त्याचा प्रश्‍न प्रलंबित होता. आ.संदिप भैय्या क्षीरसाागर यांनी दिलेला शब्दाला जागत दोन्ही रस्त्यांचा प्रश्‍न मार्गी लावला असून आता प्रत्यक्षात या रस्त्याचे काम सुरू झाले आहे. या दोन्ही रस्त्याचे भूमिपुजन माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.सुनिल धांडे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड.डी.बी.बागल यांच्यासह मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजना ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था बीड अंतर्गत रामा 55 ते अंथरवणपिंप्री रस्ता सुधारणा 3.35 कि.मी. 1 कोटी 85 लक्ष, रामा 55 ते खांडे पारगाव रस्ता सुधारणा 3 कि.मी. 1 कोटी 42 लक्ष अशा एकूण 3 कोटी 28 लक्ष रूपयांच्या कामाचे भूमिपुजन शुक्रवारी माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.सुनिल धांडे, अ‍ॅड.डी.बी.बागल यांच्या प्रमुख उपस्थितीत व अंथरवण पिंप्री, खांडेपारगाव  येथील ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आले. गेल्या अनेक वर्षापासून अंथरवणपिंप्री आणि खांडेपारगाव येथील रस्त्याचा प्रश्‍न प्रलंबित होता. याबाबत सातत्याने पाठपुरावा करून आ.संदिप क्षीरसागरांच्या माध्यमातून या दोन्ही रस्त्याचे काम प्रत्यक्षात सुरू झाले आहे. रस्ता काम सुरू झाल्यामुळे अंथरवणपिंप्री, खांडेपारगाव येथील ग्रामस्थांच्या वतीने आ.संदिप क्षीरसागर यांचे आभार मानण्यात आले आहेत.

*कामाची गुणवत्ता आणि दर्जा राखण्याच्या सूचना*

ग्रामीण भागात विकास कामे करत असतांना त्याचा दर्जा आणि गुणवत्ता राखली पाहिजे. जर कुठे रस्त्याची गुणवत्ता राखल्या जात नसेल, काम चांगल्या पद्धतीने होत नसेल तर थेट कारवाई करा अशा सूचना यावेळी आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. आ.संदिप क्षीरसागरांच्या या कडक भूमिकेमुळे ग्रामीण भागातील रस्ते दर्जेदार होण्यास मोठी मदत होणार आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा