Subscribe Us

header ads

आ.संदीपभैय्यांच्या उपस्थितीत शिवसंग्रामचे कल्याण जानवळे यांचा रा.काँ.मध्ये प्रवेश

बीड (प्रतिनिधी):- बीड विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आ.संदीपभैय्या क्षीरसागर यांच्या नेतृत्वात तालुक्यात विकासाची कामांचा झंझावात सुरु झाला असून सर्व तळागाळापर्यंत विकासाची कामे करण्यासाठी आ.संदीपभैय्या प्रयत्नशील आहेत. निवडणुकीत दिलेली वचने, आश्वासनाची पुर्तता करण्यासाठी सदैव कटीबध्द असल्याने याच विकासशील वृत्तीमुळे आ.संदीपभैय्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. आ.संदीपभैय्यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत माजी आ. सुनील धांडे, माजी आ. सय्यद सलिम यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसंग्रामचे नेते कल्याणराव जाणवळे यांनी जाहिर प्रवेश केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वाढीसाठी प्रयत्नशील राहणार असल्याचेही यावेळी जानवळे यांनी म्हटले. शिवसंग्राम नेते कल्याण जानवळे यांच्या  पक्ष प्रवेशावेळी रा.काँ.चे युवा नेते अजय कैलासराव सुरवसे, तालुकाध्यक्ष महादेव उबाळे, पं.स.सचिन शेळके, संजय गांधी निराधार समिती तालुकाध्यक्ष भाऊसाहेब डावकर, पं.स.उत्तरेश्वर सोनवणे, शहराध्यक्ष बाळासाहेब गुजर,विद्यार्थी जिल्हाध्यक्ष पंकज बाहेगव्हाणकर, झुंजार धांडे, सचिन पवार, बळीराम जानवळे, विद्यमान सरपंच काटवटवाडी परशुराम खोड, माजी सरपंच बाळू परखे, खरसाडेअण्णा आदी मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांनी कल्याण जानवळे यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छाही दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा