Subscribe Us

header ads

इयत्ता 6 वी ते 9 च्या आदिवासी इग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यानीऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन

बीड, दि.13 (जि.मा.का.):-  आदिवासी विद्यार्थ्यांना एकलव्य रेसिडेंशियल पब्लीक स्कुलमध्ये प्रवेश देण्यासाठी 2021-2022 या शैक्षणिक वर्षात राज्यातील आदिवासी विकास विभागातंर्गत इग्रजी माध्यमाच्या सर्व एकलव्य मॉडेल रेसीडेशियल स्कुल मधील इयत्ता 6 वी,7 आणि 9 वीच्या वर्गातील अनुसूचित,आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांनी https//admission.emrsmaharshtra.com ही लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे.प्रवेश घेऊ इच्छिणा-या विद्यार्थ्यांचे पालक,शिक्षक,मुख्याध्यापक यांनी ऑनलाईन अर्जासोबत मागील वर्षाचे गुणपत्रक अपलोड करुन अर्ज सादर करण्याचे आवाहन औरंगाबादचे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे.

            ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्याच्या सरल पोर्टलवरील Student id माहितीसाठी असणे आवश्यक आहे. ऑनलाईन आवेदन पत्र भरण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट 2021 आहे. प्रवेश अर्ज भरतांना तांत्रिक अडचण आल्यस मो.क्र. 8788442237 यावर संपर्क साधावा.शैक्षणिक वर्ष 2020-2021 मध्ये ज्या विद्यार्थ्याची आकारिक मूल्यमापन व संकलित मुल्यमापन किंवा आकारिक मुल्यमापन प्रक्रिया पूर्ण झालेली आहे अशा विद्यार्थ्याचे संबधित इयत्तेचे नऊ विषयाचे (मराठी,हिंदी,इग्रजी,गणित,विज्ञान/परिसर अभ्यास,सामाजिकशास्त्रे,कला, कार्यानुभव व शारिरिक शिक्षण) प्रत्येकी 100 पैकी गुण विचारात घेऊन एकूण 900 गुणांचे गुणपत्रक सादर करावे.

            गुणपत्रक अपलोड करण्यापूर्वी सदरील गुणपत्रक 900 गुणाचे असल्याची खात्री करावी. शाळेकडून श्रेणी प्रदान केलेले गुणपत्रक मार्कामध्ये रुपांतरित करुन घ्यावे. श्रेणी नमूद केलेले गुणपत्रक प्रवेशासाठी ग्राह्य धरले जाणार नाही. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा