Subscribe Us

header ads

राज कुंद्रा प्रकरणी पोलिसांचा मोठा निर्णय.

 
मुंबई-: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक करण्यात आलेल्या पॉर्नोग्राफी प्रकरणाचा तपास करणाऱ्या क्राइम ब्रांचने विशेष तपास समिती (एस.आय.टी.) स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. 
राज कुंद्रा या प्रकरणात मुख्य आरोपी असून यापुढे एसआयटी संपूर्ण प्रकरणाचा तपास करणार आहे. 
पॉर्नोग्राफी प्रकरणात सहभागी असणाऱ्यांची संख्या वाढत चालत असल्याने क्राइम ब्रांचने तपासाची व्याप्ती वाढवली आहे. 
ए.सी.पी. दर्जाचा अधिकारी या तपासाचं नेतृत्व करणार असून आतापर्यंत दाखल सर्व गुन्ह्यांचा तपास केला जाणार आहे. 
पॉर्नची निर्मिती तसंच मोबाइल अॅपच्या माध्यमातून त्या प्रसिद्ध केल्याप्रकरणी राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे.
 राज कुंद्राने ‘हॉटशॉट्स’ अॅप डेव्हलप करण्यासाठी एक कंपनी सुरु होती. 
या अॅपच्या माध्यमातून पॉर्नोग्राफी केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. 
नीरव मोदी, मेहुल चोक्सीप्रमाणे राज कुंद्राही देश सोडून फरार झाला तर?, 
मुंबई पोलिसांना भिती नव्याने स्थापन केलेली एस.आय.टी. पॉर्नोग्राफी प्रकरणात दाखल झालेले सर्व एफ.आय.आर. हाताळणार आहे. 
पॉर्नोग्राफी प्रकरणात वेगवेगळे एफ.आय.आर.तक्रारी, अनेक पीडित आणि आरोपी असल्यानेच एस.आय.टी. स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 त्यामुळे आता कोणीही आणि कोणत्याही पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या सर्व तक्रारी एस.आय.टी.कडून हाताळल्या जाणार आहेत. 
अटकेनंतर राज कुंद्रांनी पहिल्यांदाच मे.न्यायालयासमोर मांडली भूमिका, म्हणाले.

तो कंटेट पॉर्न नाही तर दरम्यान ७ ऑगस्टला मे.मुंबई हायकोर्टाने राज कुंद्रा आणि त्याचा सहकारी रायन यांनी केलेला जामीन अर्ज फेटाळून लावला

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा