Subscribe Us

header ads

वाकनाथपुर गावच्या विकासाचे तीन तेरा


प्रतिनिधी, नवनाथ गोरे मो. 9823310880

बीड-: बीड पासुन अवघे १५ की मी अंतरावर तीन गावची ग्रामपंचायत असणारे वाकनाथपुर हे गाव जिल्ह्याच्या जवळ असतानाही ही या गावचा विकास आणखीन शून्य आहे. या गावला आश्वासन देणारे भरपूर आहेत पण विकास करणारे कोणी नाही. प्रत्येक वर्षी गावामधे गावचे ग्रामसेवक ग्रामसभा घेतात पण गावकऱ्यांना समस्या विचारतात पण आणखीन एक ही काम पूर्ण नाही. त्यातीलच दलीत वस्तीतील नाल्याचे काम १५ ते २० वर्ष झाले तरीही आणखीन एक वेळेस ही नाल्या सफाईचे काम झाले नाही. दलीत वस्तीतील रोडचे काम दोन वेळेस झाल्याने रोड पेक्षा एक फूट नाली खाली गेली आहे आणि कित्येक वेळेस ग्राम सभेमध्ये ग्राम सेवक यांना सांगुन देखील नाली सफाईचे काम होत नाहीत नाली पूर्ण भरून आल्याने नाल्याचे पाणी रोड वरून वाहत आहे. ग्रामसेवक यांना काम करा असे बोलले असता बजेट नाही म्हणुन काम होत नाही असे बोलले जाते १५ वर्षात ग्रामसेवक यांच्याकडे कोणतंही बजेट अल नाही का? नाल्या साफ नसल्याने नाल्यावरती खुप मच्छर घोंगावत आहे त्या कारणाने गावामधे चिकन गुनिया. टाईफड  आसे अनेक रोग पसरत आहेत नाल्या साफ करण्याचे काम लवकरात लवकर करुन नाल्या रोड च्या वरती बांधून घावी अशी दलीत वस्तीतील नागरिकांची मागणी आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा