Subscribe Us

header ads

आता मते मागण्यास या आम्ही आपल्याला जागा दाखवु - जेष्ठ नागरिक रामकृष्ण पवार यांचा इशारा रस्ता व नाली साठी एकात्मता कॉलनी मधील नागरिक संतप्त.


अंबाजोगाई (प्रतिनिधी) अंबाजोगाई शहरातील मोरेवाडी लगत असलेल्या न प हद्दी मधील एकात्मता कॉलनी मध्ये रस्ता व नाली बांधकामा साठी या परिसरातील नागरिकानी वारंवार टाहो फोडूनही नगर परिषद या ठिकाणी नाली व रस्त्याचे काम करत नसल्याने नागरिकात तीव्र संताप व्यक्त होत असुन आता मते मागण्यास या तेव्हा आम्हीही आपल्याला आपली जागा दाखवु असा इशारा या भागातील जेष्ठ नागरिक रामकृष्ण पवार गुरुजी यांनी दिला आहे.अंबाजोगाई शहरा नजीकच्या मोरेवाडी लगत असलेली एकात्मता कॉलनी गेल्या २० वर्षापासुन नगरपालिका हद्दीमध्ये समाविष्ट आसुन एकात्मता कॉलनीच्या पूर्वेकडील भागात सांडपाणी वाहुन नेण्यासाठी, नालीचे काम अद्यापही झालेले नाही. त्यामुळे या ठिकाणी सांडपाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. एकात्मता कॉलनीच्या पूर्वेकडील भागात प्रत्येक घराजवळ पाण्याचे डबके तयार झाले आसुन  जे प्लॉट रिकामे आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सांडपाणी जमा झाले आहे. यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर डास आणि दुर्गधी झाली आहे. अगोदरच करोना, डेंगू यांची साथ आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
या भागाचे नगरसेवक श्री दिनेश भराडिया, श्री संतोष शिनगारे यांना वारंवार नाली कामाच्या संदर्भात या ठिकाणचे नागरिक प्रत्यक्ष भेटले. त्यांना फोन लावले परंतु त्यांनी लवकर करतो म्हणुन नुसती आश्वासने दिली.एक महिन्यापूर्वी दिनेश भराडिया यांनी काम सुरु करतो म्हणून प्रा. संजय पवार यांच्या घराजवळ जे सी बी ने खोदुन ठेवले आहे आणि भर रस्त्यात फक्त कच खड़ी आणि मोठी खडी आणून टाकली आहे. या कामा संदर्भात येथील नागरिकांनी नगरसेवकांना अनेक वेळा फोन लावले मात्र ही मंडळी फोन उचलल नाहीत. येथील रहिवासी नगरपालिकेचे सर्व कर, नियमितपणे भरत आले असताना त्यांना न प कडुन मिळणाऱ्या  मूलभूत सुविधा पासुन वंचित राहावे लागत असुन त्यांना अन्याय आणि त्रास सहन करावा लागत आहे.
या ठिकाणी निर्माण झालेल्या दुर्घन्धी मुळे रोगराई होऊन 8 दिवसा पुर्वी चि. आदित्य संजय कदम या 19 वर्षीय युवकास आपले प्राण गमवावे लागले असुन नागरिक हैराण झाले आहेत.या संदर्भात येथील रहिवासी असलेल्या नागरिकांनी मुख्याधिकारी यांना लेखी निवेदनही दिले असुन या निवेदनावर श्री रामकृष्ण पवार, श्री. संतोष कदम, श्री. महारुद्र पाळवदे, श्री. जालिंदर सोळके, श्री. कल्याण सोनवणे, श्री. श्रीधर उडाळकर, श्री. रामदास शिंदे, श्री. रामकिसन अंबाड, श्री. प्रभाकर कांबळे, श्री. सुनील मस्के, श्री. सतीश पांचाळ, श्री. प्रभाकर देशमाने, श्री. राजाभाऊ स्वामी, ऍड पंकज खांडेकर, श्री. उद्धव कदम आदी रहिवाशांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या संदर्भात प्रतिक्रिया देताना येथील जेष्ठ नागरिक रामकृष्ण पवार हे संतप्त झाले असुन त्यांनी आता नगर परिषदेच्या निवडणूक असल्याने आता मते मागण्यास या तेव्हा आम्हीही आपल्याला आपली जागा दाखवु असा इशारा विद्यमान सह सर्व पक्षाच्या ईच्छुक उमेदवारांना दिला आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा