Subscribe Us

header ads

चुंबळी अत्याचार प्रकणी आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करुन कड़क शासन करावे; लोकसेना

बीड, (प्रतिनिधि) :- तालुक्यातील चुंबळी गावी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झालेला आहे या घटनेचा लोकसेना संघटना जाहीर निषेध करते व माणूसकीला काळीमा फासणाऱ्या आरोपीवर पोलिस प्रशासनाने खुनाचा गुन्हा दाखल करुन कड़क शासन करावे अशी मागणी लोकसेना संघटना प्रमुख प्रा. इलियास इनामदार यांनी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकासह राज्याचे मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे साहेब यांना ईमेल द्वारे केली आहे.

पाटोदा तालुक्यातील चुंबळी गावी एका अल्पवयीन मुलीला गावातील एक हरामखोर आरोपी सतत त्रास देत होता मुलीचे आई वडील घरी नसताना मुलीला एकटी पाहून तिच्यावर अत्याचार करुन तिचा खून केला ही घटना म्हणजे माणूसकीला काळीमा फासनारी होय अशा आरोपीला फासावर लटकावले पाहिजे. सुर्डी व सिरसाळा प्रकरण ताजा असताना चुंबळी घटना घड़ने म्हणजे बीड जिल्ह्यात कायदयाचा धाक राहिला नाही.

जिल्हा प्रशासनाच्या ढीसाड कारोबाराने बीडचा बिहार करुन टाकला जिल्ह्यात एका महिन्यात अनेक अत्याचार झाल्याचे निदर्शनास आल्याचे आपल्याला पहावयास मिळाले जिल्ह्यात वाळू तस्करी, मटक्याचे धंदे, पत्तेचे कलब, सर्रास दारू विक्री, सावकाराचा धुमाकुळ गुंडागर्दी अशा गुन्हेगारीने डोके वर काढलेले आहे याला आळा घालण्याची जबाबदारी जिल्हा कलेक्टर व पोलिस अधीक्षक यांची असते पण दोघेही अपयशी ठरले आहे. वेळीच जिल्हा प्रशासनाने गंभीरता दाखवली तर अशा घटना प्रशासन टाळू शकतो व गुन्हेगारीवर आळा बसेल व स्वत: पोलिस अधीक्षकान्नी चुम्बळी प्रकरण हाताळून आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करावा व आरोपीला जन्मठेप किंवा फाशी होण्याकरीता प्रयत्न करावे अशी मागणी लोकसेना संघटनेने केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा