Subscribe Us

header ads

पोलीस अधीक्षक आर राजा यांच्या पथकाची वाळू माफिया विरुध्द कारवाई

नवनाथ गोरे 9823310880



(गेवराई प्रतिनिधी) बीड पोलीस अधीक्षक आर राजा यांच्या पथकाने  वाळू माफिया विरुध्द कारवाई करुन बीड जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा दिला आहे.
आर राजा यांच्या पथकाचे प्रमुख एपी आय हजारे यांच्या टीम ने आज पहाटे गेवराई तालुक्यातील राक्षभुवन येथे जाऊन परिसरातील वाळू माफिया विरुध्द कारवाई केली असता त्यांना नदी पात्रात जे सी बी हायवा मध्ये वाळू भरत असताना टीम ने छापा टाकला असता त्या मध्ये दोन जे सी बी हायवा क्रमांक एम एच २३ ए व्ही १८५५ हायवा क्रमांक एम एच ४६ ए आर ४१४८आणि काही वाळू असा एक कोटी पाच लाख वीस हजार रुपयेचा माल जप्त करुन आठ  जणांविरुद्ध चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याप्रकरणी जेसीबी चालक संदीप सुरेश पवळ रा.ढाकलगाव तालुका अंबड .हायवा चालक सलमान मिर्झा बेग वय 24 वर्षे रा. इस्लामपुरा बीड. हायवा चालक महादेव दगडू निर्मळ वय 35 वर्षे रा.शिदोड तालुका बीड सोबत आणखीन पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणखी एक जेसीबी चालक फरार असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगितले आले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा